शिल्पा शेट्टी करतेय २ योगासने ज्यामुळे होईल तब्येतीला खूप फायदा….

एकदम फिट असणारी कायम तरुण भासणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही काही दिवसांपूर्वी अपघातग्रस्त झाली असल्याने ती सध्या चालू फिरू शकत नाही. तिचा पाय मोडला असून तिला व्हिलचेअरवर बसण्याशिवाय पर्याय नाही. पण तरीही शिल्पाने आपल्या व्यायामात खंड पडू दिलंला नाही. शिल्पा आधुनिक व्यायामप्रकारापेक्षा योगासनांवर भर देताना दिसते. या व्हीलचेअरवर बसूनही तिने आपल्या चाहत्यांसाठी सोपी आसनं करून दाखवली आहेत, असा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ही सहज करता येणारी आसने खूप फायदेशीर आहेत. (Shilpa Shetty showing easy yog aasans)

पहिले आसन

गोमुखासन (Cow Face Pose)

१. गोमुखासन करण्यासाठी मांडी घालून जमिनीवर बसावं. कोणताही एक पाय वर तर दुसरा खाली अशी मांडी घालावी. हळूहळू दोन्ही पाय जवळ ओढून गुडघे एकमेकांजवळ आणण्याचा प्रयत्न करायला हवा. उजवा हात उचलून त्याचा पंजा आपल्याला पाठीवर ठेवावा. तर डावा हात खालच्या बाजूने पाठीवर ठेवत तो उजव्या हाताच्या पंजाला जोडण्याचा सराव करावा. तसंच उलट ही करण्याचा प्रयत्न करून हे आसन करावं.

२. हे आसन करण्यामुळे आपली शारीरिक ठेवण सुधारली जाते. छाती, दंड आणि खांदे या भागातील स्नायूंना लवचिकता येते. फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी हे आसन लाभदायक आहे. खांदेदुखी असणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने या आसनाचा सराव करावा.

दुसरे आसन

ताडासन (Swaying Palm Tree Pose)

१. या आसनाच्या नावावरूनच थोडा अंदाज आला असेल. यासाठी ताडाप्रमाणे ताठ उभं रहावं लागतं. यानंतर दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये अडकवावीत. आपले हात तसेच वर घ्या. त्याचबरोबर आपल्या चवड्यांवर आपला तोल सांभाळा. हाताचे पंजे वरच्या दिशेने ढकला. संपूर्ण शरीर ताणले गेले पाहिजे.

२. या आसनाच्या सरावाने पचन संस्थेचे कामकाज सुरळीत होते. पाठ, कणा व कंबरेतील स्नायू या आसनामुळे लवचिक होतात. पोटाच्या भागावर ही ताण आल्याने येथील चरबी कमी होण्यास सुरुवात होते. पाठीच्या खालच्या भागात जर वेदना होत असतील तर त्यांनी हे आसन करणं टाळावं.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole