बसमधील एका घटनेनं बदललं आयुष्य आणि बनली IPS

एखादी घटना अशी असते की त्यामुळे आयुष्यच बदलून जातं. काही वेळा चांगल्या गोष्टी होतात तर काही वेळा वाईट. अशीच गोष्ट आहे IPS Shalini Agnihotri यांची.

अनेकवेळा लोक आपल्याला मारलेला टोमणा विसरून जातात परंतु खरी मज्जा तर तेव्हा येते जेव्हा त्या मारलेल्या टोमण्यातून यशाचा अंकुर बाहेर येतो. परंतु हे यश त्यांनाच मिळत असते, जे मारलेल्या टोमण्याचा एक इंधन म्हणून वापर करतात आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी दिवस आणि रात्र एक करतात.

अशीच गोष्ट आहे IPS अधिकारी शालिनी अग्निहोत्री यांची.

IPS Shalini Agnihotri आपल्या हुशारी आणि मेहनतीच्या जोरावर UPSC मध्ये 185 वा रँक मिळवला आणि देशाची सेवा करण्यासाठी पोलीस दलात सामील झाल्या.

शालिनी अग्निहोत्री यांची गणना देशातील डॅशिंग IPS अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. त्यांचं केवळ नाव एकूण गुन्हेगार थरथर कापतात.

IPS शालिनी अग्निहोत्री, Marathi Motivation, Success story in marathi, IPS, UPSC, shalini agnihotri
Source – Deccan Herald

यशाच्या या शिखरावर पोहोचण्याचा प्रवास त्या दिवशी सुरू झाला होता जेव्हा शालिनी आणि त्यांची आई बसने प्रवास करत होत्या. ज्या बाकावर शालिनी बसल्या होती त्या बाकाच्या अगदी जवळच एक व्यक्ती उभा होता. तो व्यक्ती पुन्हा पुन्हा शालिनी बसलेल्या बाकाच्या हँडलला हात लावत होता.

शालिनी यांनी त्या व्यक्तीला हात खाली करायला अनेकदा सांगितले परंतु त्या व्यक्तीने त्याकडे दुर्लक्ष केले, उलट त्यानेच शालिनीला टोमणा मारले, “मला ऑर्डर सोडायला तू काय कलेक्टर आहेस काय”.

त्यावेळी शालिनी खूपच लहान होत्या, कलेक्टर म्हणजे काय हे माहिती देखील नव्हते. परंतु त्यांना हे कळाले होते की ही पोस्ट काहीतरी पॉवर असलेली पोस्ट आहे.

मूळ हिमाचल प्रदेश मधील ‘उना’ जिल्ह्यातील ‘थाथक’ या गावात राहणाऱ्या शालिनी अग्निहोत्री (IPS Shalini Agnihotri) यांचे जीवन या घटनेनंतर पूर्णपणे बदलूनच गेले. पुढे जाऊन त्यांनी यूपीएससी या परीक्षेची तयारी सुरू केली.

शालिनीचे वडील रमेश हे एक बस कंडक्टर आहे तर आई एक गृहिणी आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील शालिनी अगदी जीव तोडून अभ्यास करू लागली. शेवटी अथक परिश्रमानंतर तिने यश मिळवलेच, शालिनी यांनी यूपीएससी मध्ये देशात 185 वा रँक मिळवला होती.

असे सांगितले जाते की शालिनी यांनी कुठल्याही कोचिंग क्लासेस न लावता यश संपादन केले. शालिनी भारतीय पोलीस सेवेमध्ये एक डॅशिंग आणि जबरदस्त IPS अधिकारी म्हणून म्हणून ओळखल्या जातात.

STI महिला प्रवर्गातून महाराष्ट्रातून प्रथम आशा घुले

अभ्यास करायचा ध्यास

(IPS Shalini Agnihotri) शालिनी अग्निहोत्री दररोज पहाटे तीन पर्यंत अभ्यास करत असत. दिवसा शालिनी MSC च्या मुलांना शिकवत असे आणि त्यानंतर घरी येऊन यूपीएससीचा अभ्यास करत असत.

शालिनीचे आई वडील असे सांगतात की, शालिनी संपूर्ण रात्र रात्र अभ्यास करत असत. शालिनी यांनी हिमाचल प्रदेश मधील एका धर्मशाळेमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले तर हिमाचल प्रदेश मधील एग्रीकल्चर युनिव्हर्सिटीमधून एग्रीकल्चर या विषयात पदवी संपादित केली.

IPS शालिनी अग्निहोत्री, Marathi Motivation, Success story in marathi, IPS, UPSC, shalini agnihotri
Awards galore

शालिनी लहानपणापासूनच अभ्यासामध्ये खूपच हुशार होत्या. त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांना नेहमी असे वाटत असे की, शालिनी मोठी झाल्यावर काहीतरी नक्की बनणार आहे.

शालिनीने जेव्हा यूपीएससीची तयारी सुरू केली तेव्हा तिच्या परिवारातील सदस्यांना याबाबत काहीच कळत नव्हते. तिने अभ्यासासाठी लागणारे सर्व स्टडी मटेरियल इंटरनेटद्वारे मिळवले तसेच. पुस्तके, मॅगझीन आणि वृत्तपत्रा इत्यादी गोष्टी वापरून यूपीएससीची तयारी केली.

शालिनी यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे. असे सांगितले जाते की शालिनी यांची बहिण डॉक्टर असून भाऊ हा इंडियन आर्मी मध्ये सेवेत आहे. शालिनी यांचा भाऊ आपल्या बहिनी प्रमाणेच खूपच हुशार आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नामध्ये एनडीएच्या परीक्षेत यश मिळवले होते.


3 Comments
  1. रोहन अवसरे says

    शालिनी ताई यांची जिद्द आणि चकाटी पाहून ऐक मनात प्रेरणा आली खूप खूप धन्यवाद

    1. Nikhil Patil says

      धन्यवाद रोहन. खूप शुभेच्छा !!!

  2. Priti Kore says

    Great story . it definitely inspired us.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole