रेड, ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्ट म्हणजे काय ? हे अलर्ट का आणि कधी जारी केले जातात ?

९ ते १२ जून दरम्यान मुंबईसह कोकणाच्या भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने ९ तारखेला मुंबईत रेड अलर्ट तर इतर दिवशी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. थोडक्यात काय तर मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

परंतु अनेकांना प्रश्न पडला असेक कि हा रेड, ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्ट म्हणजे नेमकं काय ? हे अलर्ट का आणि कधी जारी केले जातात ? जाणून घेऊयात याबद्दल अधिक –

ग्रीन अलर्ट

सगळं काही ठीक असून कुठलाही धोका नाही हे सांगण्यासाठी ग्रीन अलर्टकघी वापर केला जातो. तसेच ऑरेंज किंवा रेड अलर्ट जारी केलेला असल्यास तो मागे घेण्यासाठी ग्रीन अलर्टचा शक्यतो वापर केला जातो.

यलो अलर्ट

पुढील काही दिवसात वातावरण बिघडून संकट उद्भवू शकते. अश्या संकटापासून सावध राहा, हे सांगण्याकरिता यलो अलर्ट जारी केला जातो.

ऑरेंज अलर्ट

नैसर्गिक आपत्ती सारखं मोठं संकट कुठल्याही क्षणी धडकू शकतं. ह्यात वीज पुरवठा देखील ठप्प होऊ शकतो. गरज नसल्यास घराबाहेर पडू नये. अश्या सूचना देण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला जातो.

रेड अलर्ट

एखाद्या विशिष्ट भागात मोठं नैसर्गिक संकट आल्यास रेड अलर्ट जारी करण्यात येतो. अश्या भागात लोकांना जाण्याची मनाई असते कारण नैसर्गिक आपत्तीमुळे भयंकर नुकसान होतं. थोडक्यात परिस्थिती गंभीर होऊन जनजीवन विस्कळीत होणार असल्यास रेड अलर्ट जारी केला जातो.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole