डोळ्यांखालील काळी वर्तुळांच्या समस्येमागे ‘ही’ आहेत मुख्य १० कारणं; जाणून घ्या

प्रत्येक व्यक्तीचा चेहरा हा त्याच्या सौंदर्याबाबत बरंच काही सांगून जातो. हाच चेहरा सुंदर दिसावा यासाठी विविध प्रकारचे उपाय केले जातात. त्यामध्ये जर डोळ्यांखाली काळी वर्तुळं (Dark Circles) असतील तर समस्या आणखीनच कठीण वाटते. ही काळी वर्तुळं घालवण्यासाठी अनेकदा विविध उपाय केले जातात वेगवेगळ्या क्रीम्स फासल्या जातात. पण ही काळी वर्तुळं येतात तरी कशी? काय आहे त्यामागची कारणं…त्याचबाबत आपण आता माहिती घेणार आहोत…

डोळ्यांखाली काळी वर्तुळं येण्यामागची कारणं काय? (Reasons of undereye dark circles)

१) अनुवांशिकता हे कारण…

डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं येण्यामागचे मुख्य कारण म्हणजे अनुवांशिकता. काळी वर्तुळं येणं अनुवांशिक असल्याने ती पूर्णपणे घालवणे कठीण होत जाते. जरी ती पूर्णपणे घालवता येत नसली तरी ती थोडी पुसट करता येतात. 


२) पुरेशी झोप नसणे.
प्रत्येकाला साधारणत: ७-८ तासांची झोप अत्यावश्यक असते. पण सध्याच्या युगात अनेक कारणांमुळे बहुतांश लोक पुरेशी झोप घेत नाहीत. परिणामी, डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं तयार होतात.

३) मोबाईल, टीव्हीचा सातत्याने वापर 

मोबाईल, टीव्ही पाहण्याचे प्रमाण यांत सध्या खूप वाढ झाली आहे. ते कमी असायला हवं. सातत्याने ही साधनं पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे देखील काळी वर्तुळं निर्माण होतात.

४) जेवणात मिठाचं प्रमाण अधिक असणं
आहारात मिठाचं प्रमाण योग्यच असायला हवं. त्याचं प्रमाण अधिक असल्यास शरीरातील पेशी पाणी धरून ठेवतात. त्यामुळे त्वचा अधिक पातळ होते आणि ती काळी पडते. त्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं येत असतात.

५) कॉस्मेटिकचा वापर
मेकअप केल्यानेही अनेक समस्या उद्धवू शकतात. अनेक कॉस्मेटिक्स असे आहेत की त्यामुळे त्वचेला अ‍ॅलर्जी होते. त्यानंतर काळी वर्तुळं पडतात. याशिवाय डोळ्यांना केलेला मेकअप चुकीच्या पद्धतीने पुसल्यासही त्याचा परिणाम म्हणून डोळ्यांखाली काळी वर्तुळं तयार होतात. सनस्क्रीनमुळे सूर्याच्या किरणांपासून चेहऱ्याच्या त्वचेचे संरक्षण होतं. त्यामुळे सनस्क्रीन वापरण्यास टाळाटाळ केल्यास डोळ्याखालील त्वचेचे संरक्षण होत नाही आणि काळी वर्तुळं पडतात.

६) गरम पाण्याने चेहरा धुतल्यास…
 तुम्ही देखील गरम पाण्याने चेहरा धुत असाल तर हे करताना विशेष लक्ष द्या. गरम पाण्याने चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला जरी चांगलं वाटतं असलं तरी ही सवय त्वचेसाठी घातक असते. त्यामुळे त्वचा खराब होते.


७) आजारपण हेदेखील कारण
डोळ्यांखाली काळी वर्तुळं येण्यामागे आजारपण हेदेखील कारण असतं. आजारपणात आहाराकडे लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे शरीरास आवश्यक घटकांची कमतरता निर्माण होते. शरीर अशक्त होतं. चेहरा काळा पडतो आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळंही तयार होतात.

८) धूम्रपान केल्याने होऊ शकतो परिणाम
धूम्रपान करणं आरोग्यासाठी धोकादायक आहे. धूम्रपानामुळे त्वचा काळी पडते. तसेच रक्तप्रवाहही बिघडतो आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळं निर्माण होतात.

९) शरीरातील पाण्याची कमतरता
डोळ्यांखाली काळी वर्तुळं पडण्यामागे शरीरातील पाण्याची कमतरता हे कारण असू शकते. कमी प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची पातळी कमी होते. (Dehydration) होते. त्याचा परिणाम काळी वर्तुळं येणं हेदेखील असू शकते.

१०) उन्हात जास्त काळ राहिल्याने…
उन्हात जास्त वेळ राहिल्याने चेहऱ्यावर काळे डाग पडतात. त्याचबरोबर कडक उन्हामुळे डोळ्यांखालची त्वचेवर डाग पडतात. त्यामुळे काळी वर्तुळे तयार होतात.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole