RCEP मध्ये १५ नवीन देश सामील, भारत दूरच

RCEP – रिजनल कॉम्प्रेहेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप या करारावर आता नवीन १५ देशांनी स्वाक्षरी केली आहे. आतापर्यन्त झालेला हा सर्वात मोठा व्यापारी करार असल्याचे मानले जात आहे. आशिया—पॅसिफिकमधील १५ देशांनी आसियानच्या वार्षिक परिषदेवेळी यावर स्वाक्षरी केली आहे.

तब्बल ८ वर्षांच्या वाटाघाटी नंतर Regional Comprehensive Economic Partnership करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. भारताने या आधीच आपण करारावर स्वाक्षरी करत नसल्याचे जाहीर केले आहे. तर भारताबद्दल आम्ही आशादायी आहोत असं समूहाने म्हंटल आहे.

RCEP, आरसेप, रिजनल कॉम्प्रेहेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप, Regional Comprehensive Economic Partnership, India and rcep, rcep mpsc
Source – Global Risk Insights

कोणत्या देशांनी केली स्वाक्षरी ?

इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलँड, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार, कंबोडिया, चीन, जपान, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया

RCEP बद्दल –

  • प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी) हा एक मुक्त व्यापार करार (एफटीए) आहे
  • ASEAN च्या दहा देशांचा समावेश.
  • अधिकच्या देशांचा समावेश – चीन, जपान, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया
  • हा गट जागतिक जीडीपीच्या कमीतकमी 30% प्रतिनिधीत्व करेल अशी अपेक्षा आहे तर जगातील सर्वात मोठा मुक्त व्यापार करार म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे.
  • सामूहिकरीत्या $17 trillion GDP
  • 3 billion पेक्षा जास्त लोकांचा समावेश.
  • जागतिक व्यापाराच्या ३० टक्के वाटा.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole