शरीरात कोलेस्टेरॉल वाढवतात ५ पदार्थ; हृदयरोग नाही होणार

हृदयविकाराने मृत्यू होण्यात भारतीयांचा वरचा क्रमांक आहे. उच्च रक्तदाब (Hypertension) हृदयरोग (Cardiac diseases) हे होण्यामागचं कारण म्हणजे शरीरात वाढलेली कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी. आपल्याला हे कोलेस्टेरॉलची पातळी आवश्यक असतं अन्यथा मृत्यू होऊ शकतो. म्हणून आपल्याला खबरदारी घेणं आवश्यक आहे. (Precaution to lowering cholesterol level)

काय असतं हे कोलेस्टेरॉल?

कोलेस्टेरॉल हा एक मेणासारखा पदार्थ आहे जो आपण खातो ते प्राणी जन्य अन्न आणि आपल्या शरीराच्या पेशींमध्ये देखील आढळतो. आपल्या शरीराला सामान्यपणे कार्य करण्यासाठी काही कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते आणि आपलं शरीर आवश्यक असलेले सर्व कोलेस्टेरॉल बनवू शकतं. शरीरातील कोलेस्टेरॉलचा उपयोग संप्रेरके (Hormones) आणि ड जीवनसत्व (Vitamin D) तयार करण्यासाठी होतो. ते पचनक्रियेतही भूमिका बजावते.

प्रक्रिया केलेले मांस

खारवलेले मासे, मांस, पॅकबंद मांस अशा प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये (Processed meat) कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त असतं. कारण जेव्हा मांस साठवून किंवा टिकवून ठेवायचं असतं, तेव्हा चरबी जास्त असलेल्या मांसाला मीठासरखे पदार्थ लावून ते वाळवले जातात. मोठ्या प्रमाणावर याचं सेवन केलं तर आपल्याला आतड्याचा कर्करोग (intestinal cancer) किंवा हृदय रोग (Heart disease) होण्याचा मोठा धोका असतो. कारण या मांसामध्ये बाकी पोषणमूल्यांपेक्षा मीठ व चरबी अधिक आढळून येते. म्हणून प्रक्रिया केलेल्या मांसापेक्षा ताजं मांस खावं.

कोलेस्टेरॉलची पातळी कशी कमी करायची?

विविध आहार तज्ज्ञ म्हणतात की, शरीरात साठून राहणारं मेद ज्यामध्ये आहे असं अन्न खाऊ नये. कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढू शकतं. ज्या अन्न पदार्थांमधून शरीराला चांगलं याचा अर्थ लवकर पचेल असं कोलेस्टेरॉल मिळेल असं अन्न खावं.

तळीव पदार्थ टाळावेत.

तळलेले अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात कॅलरीजचं प्रमाण वाढतं. त्याचबरोबर यांत मेदकारक पदार्थ (Trans fat) मोठ्या प्रमाणावर असतात. हे मेदकारक पदार्थ खाल्याने शरीरात साठून राहील असं कोलेस्टेरॉल (Low density lipid) याची पातळी वाढू शकते. यातूनच जाडेपणा, मधुमेह व हृदयरोग होण्याचा दाट संभव असतो. म्हणून तळलेल्या पदार्थांचं सेवन क्वचितच करावं.

क्रीमयुक्त पदार्थ नको.

केक, डोनेट्स, कुकीज, आईस्क्रीम अशा पदार्थांमध्ये साखर, अनसॅच्युरेटेड फॅट म्हणजेच ट्रान्स फॅट असतं. या पदार्थांच्या अतिसेवनाने शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलची वाढ होते हे धोकादायक आहे. म्हणून हे गोड पदार्थ टाळावेत.

बेकरीचे पदार्थ

ब्रेड, टोस्ट, खारी असे बेकरीमध्ये बनवले जाणारे पदार्थ यांत तेल आणि मैदा असल्याने आपल्या शरीरात याच्या सेवनामुळे कोलेस्टेरॉल वाढू शकते. व हे पदार्थ खाऊन आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा थर साठतो. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास अडचणीचं होऊन जातं. म्हणून मग उच्च रक्तदाब आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा संभव असतो.

फास्ट फूड

फास्ट फूड ज्याला जंक फूड (Junk Food) ही म्हणतात. पिझ्झा, बर्गर सारखं जंक फूड खाण्यासाठी खूप गर्दी असते. पण याचा तोटा खूप आहे. वरचेवर असे पदार्थ खाल्याने पोटावर मेद वाढते. वातविकार, साखर वाढते. हे विकार होतात.

या पदार्थांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि चांगलं कोलेस्टेरॉल ही पोषणमुल्ये फारशी नसतात. त्यामुळे आपल्या शरीराचं पोषण योग्य होत नाही. तर शरीराला हे पदार्थ अपायकारक आहेत. म्हणून आतड्याचे, हृदयाचे विकार होऊ नयेत म्हणून हे पदार्थ खाणं टाळलं तर चांगलं आहे.  


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole