मुंबई पोलीस विभागात 1431 जागांसाठी भरती लवकरच, 12वी पाससाठी सुवर्णसंधी..

Mumbai Police Bharti 2022 – बारावी पास तरुणांसाठी खुशखबर आहे. मुंबई पोलीस विभाग (Mumbai District Police Department) येथे लवकरच मोठी पदभरती होणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल या पदांच्या एकूण 1431 जागांसाठी भरती होणार आहे पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 1431

पदाचे नाव : पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable)

शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

{महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}

तसंच नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे(ST) चे उमेदवार किवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षल विरोधी कारवाईत मृत झालेल्या किवा जखमी झालेल्या पोलीस बातमीदार किवा पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले असलेल्या उमेदवार जे ७ वि उत्तीर्ण आहेत,ते भरती करिता पात्र ठरतील. व उमेदवार गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेर बदलीसाठी पात्र ठरणार नाही. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

शारीरिक क्षमता :

उंची – महिलांसाठी – 155 cm
पुरुषांसाठी – 165 cm पुरुषांसाठी छाती 79 cm पेक्षा कमी नसावी.

परीक्षा फी :
खुला प्रवर्ग: 450 /- रुपये
मागास प्रवर्ग: 350 /- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार

अर्ज पद्धती : ऑनलाईन
Mumbai Police Bharti 2022 अधिकृत संकेतस्थळ : www.mahapolice.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

सूचना : येथे दिलेली संपूर्ण माहिती एका मोठ्या मराठी वेबपोर्टल वरून घेण्यात आलेली आहे. याबाबत अद्यापही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाहीय. जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर संपूर्ण डिटेल्स देण्यात येईल.


1 Comment
  1. Anand gajanan says

    I’m Anand bhalerao

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole