MPSC परीक्षांच्या निकालाचा गुंता सुटला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC Results) तर्फे घेतल्या गेलेल्या विविध परीक्षांचे निकाल आणि मुलाखती आता लवकरच घेण्यात येतील कारण महाराष्ट्र शासनाने या प्रक्रियांचा गुंता सोडवला आहे. एसईबीसी (SEBC) प्रवर्गाकरिता असलेली राखीव पदे आता खुल्या व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी म्हणजे ईडब्ल्यूएस (EWS) राखीव ठेवून त्यानुसार निकाल, मुलाखती, शारीरिक चाचणी परीक्षांचे निकाल लावले जावेत. आणि या नवीन नियमांनुसार जे उमेदवार पत्र असतील त्यांच्याच मुलाखती, शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात याव्यात. जे यासाठी पात्र ठरणार नाहीत त्यांना वगळण्यात यावे, अशा सूचना महाराष्ट्र सरकारने एमपीएससीला पत्र पाठवून दिल्या आहेत. सरकारने आयोगाला केलेल्या ज्या सूचना आहेत, त्याप्रमाणे केवळ ईडब्ल्यूएस आणि खुल्या प्रवर्गाच्याच सुधारित याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

एमपीएससीच्या घेतल्या गेलेल्या सर्व परीक्षांमध्ये मराठा आरक्षण लागू केले होते पण मराठा आरक्षण सप्टेंबर २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगित करण्यात आले होते म्हणून राज्यसरकारपुढे MPSC Results प्रक्रिया हा मोठाच गुंतागुंतीचा मुद्दा झाला होता. गेल्या वर्षी जुलै २०२० मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षेचा निकाल लागला पण त्यानंतर मुलाखती घेण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयामुळे आडकाठी आली व अजूनही याप्रलंबित आहेत. त्याचबरोबर पशुधन विकास अधिकारीपदाच्या ४३५ व पोलिस उपनिरीक्षक पदाच्या ४६९ जागांच्या नियुक्त्या अजूनही करता येत नाहीत.

आधी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना आता ईडब्ल्यूएस किंवा खुल्या प्रवर्गातील नियुक्तीचा मार्ग निवडता येणार आहे. पात्र उमेदवारांची नव्या नियमांनुसार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून पर्याय घेऊन त्याप्रमाणे ईडब्ल्यूएस किंवा खुल्या प्रवर्गामधून नियुक्तीकरता शिफारस करावी लागणार आहे.

एसईबीसीमधील ज्या उमेदवारांचे वय हे खुल्या प्रवर्गातील वयोमर्यादेच्या अटीच्यापेक्षा जास्त असेल तर त्यांच्याबाबत जाहिरातीतील तरतूदींनुसार मागासवर्गीयांसाठी असलेली वयोमर्यादा व परीक्षा शुल्काबाबत दिलेली सवलत या दोन्ही काम ठेवाव्यात अशी सूचना सरकारने दिल्या आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole