राज्यातील ग्रॅज्युएट्ससाठी थेट अधिकारी होण्याची संधी; MPSC कडून तब्बल 1037 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अप्लाय

MPSC Recruitment 2023

MPSC Recruitment 2023 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय, दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क, कर सहाय्यक, गट-क, लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क, लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 असणार आहे.

या पदांसाठी भरती

पद क्रपदांसाठी भरतीएकूण जागा
1उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय06
2दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क09
3कर सहाय्यक, गट-क481
4लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क510
5लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क31

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

उद्योग निरीक्षक गट-क उद्योग संचालनालय – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञानामधील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

दुय्यम निरीक्षक, गट-क राज्य उत्पादन शुल्क – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदवीधर पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

नवीन वर्ष नवी मेगाभरती; राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी ओपनिंग्स; पात्रता फक्त 12वी

कर सहाय्यक, गट-क – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदवीधर आणि मराठी आणि इंग्रजी टायपिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क -या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदवीधर आणि मराठी टायपिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदवीधर आणि इंग्रजी टायपिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

इतकं असेल शुल्क

  • Open/OBC/EWS – 544/- रुपये
  • SC/ST – 344/- रुपये
  • PWD/ Female – 344/- रुपये

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2023

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate  या लिंकवर क्लिक करा.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole