MPSC परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होणार

MPSC – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परिक्षा पुढे ढकलून आता महिना होत आला तरी नवीन तारखा (MPSC New Dates) जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांना लवकरच गोड बातमी मिळणार आहे. महाराष्ट्र सरकार लवकरच प्रलंबित MPSC परीक्षांची तारीख जाहीर करणार आहे.

प्रकाश शेंडगे यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोग येत्या 2 ते 3 दिवसात परीक्षांच्या नाविन तारखा MPSC New Dates जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवारांना लवकरच दिलासा मिळणार अस सध्या चित्र दिसत आहे.

MPSC परीक्षा लांबणीवर का ?

कोरोनासह इतर सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. यानंतर आता आयोगाने अजून एक घोषणा केली आहे. MPSC – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आता महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

यातील महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा पुढच्या महिन्यात म्हणजे २२ नोव्हेंबर २०२० ला तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा ०१ नोव्हेंबर २०२० ला होणार होती. राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यानी जाहीर केल्यानंतर या परीक्षणाबाबत कुजबुज हळू झाली होती त्यावर आता आयोगाने केलेल्या घोषणेने स्पष्ट झाले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole