MPSC ची परीक्षा पुन्हा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत येत्या रविवारी ११ ऑक्टोबर २०२० ला घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे असे मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर जाहीर करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाबाबत विविध संघटना आक्रमक झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती.

सध्या कोरोनाचे संकट अजूनही मोठ्या प्रमाणात आहे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार तसेच त्यांना अभ्यासाला अजून वेळ मिळावा या उद्देशाने राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच परीक्षा कधी होणार याबाबतही लवकरच सांगितले जाईल असाही त्यांनी सांगितले आहे.

एकही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही

परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या पात्रतेचा प्रश्न निर्माण झाला आहे पण आता जे विद्यार्थी परीक्षेला पात्र ते सरसकट विद्यार्थ्या जेव्हा परीक्षा होईल तेव्हाही पात्र असतील असं सांगण्यात आले आहे. सारासार विचार करता परीक्षा पुढे ढकलली आहे, यानंतर जी तारीख असेल त्यात बदल होणार नाही अशी मुख्यमंत्री म्हणाले.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole