MPSC परिक्षेबाबत कोणतीही हालचाल नाही, विद्यार्थी चिंतेत

एप्रिल 2020 मध्ये नियोजित असलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मार्च महिन्यात नियोजित असलेली संयुक्त पूर्व परीक्षा तब्बल दोन वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेला आता महिना होत आला तरीपण परीक्षेच्या नवीन तारखेबाबत कोणतीही हालचाल दिसत नसल्याने विद्यार्थी वर्गात असंतोष पाहायला मिळत आहे.

पहिल्यांदा कोरोनाच्या महामारीमूळे तर दुसऱ्या वेळी मराठा आरक्षणाचा विविध संघटनांनी तीव्र विरोध केल्यामुळे लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणार परीक्षा पुढे ढकलण्यात आली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन तारखा लवकरच जाहीर करू आणि पुन्हा परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाहीत असं आश्वासन दिले होते.

आता या घोषणेला महिना होत आला तरी प्रशासकीय पातळीवर परीक्षा घेण्याबाबत कोणतीही हालचाल पाहायला मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यंदाच्या या 200 जागांसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेसाठी 2 लाख 60 हजार लोकांनी नोंदणी केली असून यासाठी परिक्षर्थी 2 वर्षांपासून अभ्यास करत आहेत. काही उमेदवार तर तब्बल 4 वर्षांपासून याची तयारी करत आहेत. अनेकांनी यासाठी परिस्थिती नसताना पोटाला चिमटा काढून यासाठी पैसे उभे केले आहेत पण आता गोष्टी सहन होण्याच्या पलीकडे जात असल्याचे अनेक उमेदवारांनी बोलून दाखवले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole