MPSC दुय्यम सेवा आणि अभियांत्रिकी परीक्षा लांबणीवर
कोरोनासह इतर सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. यानंतर आता आयोगाने अजून एक घोषणा केली आहे. MPSC – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आता महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
यातील महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा पुढच्या महिन्यात म्हणजे २२ नोव्हेंबर २०२० ला तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा ०१ नोव्हेंबर २०२० ला होणार होती. राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यानी जाहीर केल्यानंतर या परीक्षणाबाबत कुजबुज हळू झाली होती त्यावर आता आयोगाने केलेल्या घोषणेने स्पष्ट झाले आहे.