MPSC कडून मिळणार उत्तरपत्रिकांच्या स्कॅन इमेजेस

MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या सर्व परीक्षांच्या पेपर तपासणीनंतर उत्तरपत्रिकेच्या स्कॅन इमेज उमेदवारांना त्यांच्या प्रोफाइलवर मिळणार आहेत.

आतापर्यंत सदरील परीक्षेच्या निकालानंतर परीक्षार्थींना उत्तरपत्रिकेची मूळ प्रत पाहता येत नव्हती. मात्र आता सदरील निर्णयाने ती पाहता येणार असून यामुळे निकालातील पारदर्शकता वाढणार आहे.

MPSC, MPSC News, MPSC New Announcement, MPSC पारदर्शकता
Source – Loksatta

निर्णय असा होणार लागू :

निकाल लागल्यावर उमेदवाराला त्याच्या प्रोफाईलवर उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज, निकालाकरीता गृहित धरलेले एकूण गुण , उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गाकरीताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा यांची माहिती मिळेल.

आयोगाने सदरील निर्णय हा 1 ऑक्टोबर नंतर आयोजित होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा तसेच चाळणी परीक्षांकरीता लागू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, संबंधित परीक्षेमध्ये उमेदवाराने प्राप्त केलेल्या गुणांच्या बाबतीत कसलीही शंका न राहता पारदर्शकता यावी याकरिता आयोगाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole