MBMC : मिरा भाईंदर महानगरपालिकेत ४४ जागांसाठी भरती

Mira Bhaindar Mahanagarpalika Recruitment 2022 : मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ जुलै २०२२ आहे.

एकूण जागा : ४४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) शिक्षक (प्राथमिक) / Teacher (Primary) ३६
शैक्षणिक पात्रता : 
१२ वी परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान) व डी.एड. किंवा बी.एस्सी व बी.एड. उत्तीर्ण असणे आवश्यक

२) शिक्षक (माध्यमिक) / Teacher (Secondary) ०८
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी व बी.एड. उत्तीर्ण असणे आवश्यक

वयाची अट : १५ जुलै २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

अर्जदाराने खालीलप्रमाणे प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

अ) शाळा सोडल्याचा दाखला.
ब) जातीचे प्रमाण पत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र (मागासवर्गीय असल्यास)
क) वैधता प्रमाणपत्र/नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारासाठी)
ड) 12 वी Science उत्तीर्ण प्रमाणपत्र व D.ed पदवी प्रमाणपत्र (प्राथमिक शिक्षकांसाठी)
इ) Bsc. पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र व B.ed उत्तीर्ण प्रमाणपत्र (माध्यमिक शिक्षकांसाठी)
ई) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी/सीईटी) उत्तीर्ण प्रमाणपत्र
उ) अनुभवाचे प्रमाणपत्र
ऊ) जन्म दाखला/ डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्रात वास्तव्य)

उमेदवार अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाण किमान ४०% असणे आवश्यक आहे. उमेदवाराने अपंगत्वाचे संबंधित जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय तज्ज्ञाने शासकीय सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मिरा-भाईंदर,

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आस्थापना विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईदर (प).

अधिकृत संकेतस्थळ : www.mbmc.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :  येथे क्लीक करा


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole