डिप्लोमा आणि डिग्री इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी; MahaGenco मध्ये 661 जागांसाठी भरती

MahaGenco Bharti 2022

MahaGenco Bharti 2022 – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

सहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) – 339 पदे

कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) – 322 पदे

एकूण जागा – 661

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.E / B.Tech. in Electrical Engineering / Mechanical Engineering/ Electronics Engineering/Instrumentation Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Diploma in Electrical Engineering/ Mechanical Engineering/ Electronics Engineering/ Instrumentation Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

असं असेल पे स्केल

सहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) – 49210-2165-60035-2280-119315 रुपये

कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) – . 37340-1675-45715-1740-63115-1830-103375 रुपये

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2022 

MahaGenco Bharti 2022 पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mahagenco.in/career/  या लिंकवर क्लिक करा.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole