आठवडाभरात दाट, लांबसडक केस हवेत? वाचा जावेद हबीबचा खास उपाय; केस गळणंही थांबेल

बदलत्या जीवनशैलीत नोकरी असो वा कौटुंबिक जबाबदाऱ्या हे सर्व सांभाळताना आपल्या आरोग्याकडे काही प्रमाणात अनेकांचे दुर्लक्ष होत असतं. त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यापैकीच एक आहे केसांची समस्या. बहुतांश लोकांना ही समस्या भेडसावत असते. पण आता चिंता करण्याची गरज नाही. कारण हेअर एक्सपर्ट जावेद हबीब (Javed Habib) यांनीच दाट व लांबसडक केस होतील याबद्दलचा उपाय (Solution for long hair) सांगितला आहे. जाणून घ्या हा उपाय आहे तरी काय… 

१५ मिनिटांच्या उपचाराने होईल केस गळण्याची समस्या दूर

सध्या केसांवर प्रभावी आणि जलद परिणाम व्हावा यासाठी विविध प्रकारचे केमिकल्सयुक्त उपचार उपलब्ध आहेत. मात्र, जावेद हबीब यांनी कोणत्याही केमिकल्सशिवाय केसांची वाढ कशी वेगाने होईल असा कानमंत्र दिला आहे. हे फार काही खर्चिक नाही तर तुमच्या स्वयंपाकघरातील पदार्थांपैकी एक आहे. 

कांदा आणि आलं फायद्याचे

सर्वप्रथम कांदा आणि आलं बारीक करा. त्यांचा रस तयार करावा. त्यानंतर कांदा आणि आलं यांचा रस तयार झाल्यानंतर दोन्ही एकत्रित करा. पण हे करत असताना त्यांचं प्रमाण समान असावं याची विशेष काळजी घ्या. या दोन्ही पदार्थांचा रस पूर्णपणे ताजा असावा. असे केल्यास केसांवर याचा परिणाम लगेच दिसून येईल, असे हबीब यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे. 

केसांना असे लावा तयार केलेले मिश्रण

तयार केलेले मिश्रण केसांच्या मुळापर्यंत जाईल याची खात्री करा. कारण केसांची वाढ होण्यासाठी मुळांना योग्य पोषण आवश्यक आहे. अशाप्रकारे काळजी घेतल्यास केसांची वाढ चांगली होते. आलं आणि कांदा यांचं तयार केलेले मिश्रण केसांमध्ये १० मिनिटांपर्यंत ठेवावे लागेल. त्यानंतर शॅम्पूने केस धुवावे. हे मिश्रण उपयुक्त ठरते.

आठवड्यातून एकदाच करा अन् परिणाम अनुभवा

आलं आणि कांदा यांचे तयार केलेले मिश्रण केसांना आठवड्यातून फक्त एकदाच लावावे. पण हे करत असताना मिश्रण १० मिनिटांपर्यंत केसांमध्ये लावावे. याचा परिणाम केसांच्या वाढीवर दिसून येईल. हीच प्रक्रिया काही आठवड्यांपर्यंत सुरुच ठेवावी. याचा मोठा फरक जाणवेल. 


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole