पंतप्रधान मोदींना बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर | MPSC Current Affairs

सार्वजनिक स्वच्छतेच्या हेतूने देशात ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरु करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या योगदानासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा गौरव केला जाणार आहे. बिल अ‍ॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून त्यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती सोमवारी पंतप्रधान कार्यालयाने दिली.

ऑक्टोबर २०१८ मध्ये मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी पंतप्रधानांचे कौतुक केले होते. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून देशात ८ कोटींहून अधिक स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे देशात पाच लाख गावे ही हागणदारीमुक्त झाली असल्याचे सरकारी आकडेवारीवरुन कळते.


मोदींना मिळालेले इतर सर्वोच्च नागरी सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी,  बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन, स्वच्छ भारत अभियान, बिल गेट्स, स्वच्छतागृहांची निर्मिती, पाच लाख गावे ही हागणदारीमुक्त, मोदींना मिळालेले सन्मान, MPSC Current Affairs, Mpsc360, Mpsc tips, Mpsc Materials, Current Affairs in marathi, ऑर्डर ऑफ झायेद, द ग्रॅण्ड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन, किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रिनैसन्स, द किंग अब्दुल्लाझीज, द आमीर अमनुल्हा

१. UAE
हा पुरस्कार UAE संस्थापक शेख झायेद बिन सुल्तान अल नाहयान यांच्या नावाने देण्यात येतो. मोदींना ऑर्डर ऑफ झायेद हा पुरस्कार शेख झायेद यांच्या जन्म शताब्दी वर्षात देण्यात आला हे एक वैशिष्टय.

२. बहारिन
द्विपक्षीय संबंध बळकट केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २५ ऑगस्ट २०१९ रोजी बहारिनचे राजे हमाद बिन इसा बिन सलमान अल खलिफा यांच्या हस्ते ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रिनैसन्स’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

३. पॅलेस्टाईन
१० फेब्रुवारी २०१८ रोजी पॅलेस्टाईन ‘द ग्रॅण्ड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन’ हा पुरस्कार मोदींना देण्यात आला. हा परदेशी नागरिकांना देण्यात येणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

४. सौदी अरेबिया
३ एप्रिल २०१६ साली सौदी मधील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘द किंग अब्दुल्लाझीज’ पंतप्रधान मोदींना सौदी अरेबियाने प्रदान केला.

५. अफगाणिस्तान
राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी ‘द आमीर अमनुल्हा’ हा सर्वोच्च पुरस्कार मोदींना ३ जून २०१६ रोजी प्रदान केला.

६. मालदीव
८ जून २०१९ रोजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या हस्ते सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘रुल ऑफ निशान इझ्झुदीन’ मोदींना देऊन गौरव करण्यात आला.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole