भारतीय पोस्टमध्ये 8 वी पाससाठी भरती, 63000 पर्यंत पगार मिळेल, असे करा अर्ज

India Post Recruitment 2022

India Post Recruitment 2022 : भारतीय पोस्टमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी उमेदवार 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करू शकतील याची नोंद घ्या.

रिक्त पदाचे नाव :
भरतीद्वारे मेकॅनिकची 1, इलेक्ट्रिशियनची 2, पेंटरची 1, वेल्डरची 1 आणि सुताराची 2 पदे भरली जाणार आहेत. दु

पगार : निवडलेल्या उमेदवारांना सातव्या वेतनश्रेणी आयोगाच्या लेव्हल 2 पे मॅट्रिक्स अंतर्गत पगार म्हणून ₹ 19900 ते ₹ 63200 दिले जातील.

कोण अर्ज करू शकतो
संबंधित ट्रेडमधील प्रमाणपत्र धारक किंवा या ट्रेडमधील 1 वर्षाचा अनुभव असलेले 8 वी पास असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. यासोबतच मोटार व्हेईकल मेकॅनिक पदांसाठीही ड्रायव्हिंग लायसन्स अनिवार्य आहे.

वयोमर्यादा
UR आणि EWS साठी 1 जुलै 2022 पर्यंत या पदांसाठी वयाची अट 18 ते 30 वर्षे आहे आणि केंद्र सरकारच्या सूचना किंवा निर्देशांनुसार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 40 वर्षे वयाची आहे.

अर्ज कसा करायचा
उमेदवारांनी अधिसूचनेमध्ये दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून ‘द मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, सीटीओ कंपाउंड, तल्लाकुलम, मदुराई-625002’ वर पाठवणे आवश्यक आहे. स्पीड पोस्ट किंवा नोंदणीकृत पोस्टद्वारे अर्ज पाठविला जाऊ शकतो. याशिवाय, उमेदवार https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/IP_19092022_MMS_TN_Eng_01.pdf या लिंकला भेट देऊन भरती अधिसूचना पाहू शकतात आणि सर्व माहिती तपासू शकतात.


8 Comments
  1. Chetan kapse says

    Ok

  2. ROHAN GIRE says

    Indian post recruuiment

  3. Sanket Mhaskar says

    Yes I’m in arun education 10 bilow

  4. Suraj Sanjay zinjurde says

    [email protected] karanti nagar ambajogai beed Maharashtra

  5. Suraj Sanjay zinjurde says
  6. Ashishmane says

    Hi

  7. Yuvraj Chavan says

    Yuvraj Chavan

  8. Yuvraj Chavan says

    Hii

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole