एमपीएससी कशी क्रॅक करायची?

MPSC परीक्षा देताना सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर लक्ष्य असले पाहिजे आणि वेळेचे नियोजन करता पाहिजे. स्पर्धा परीक्षा देताना काही विद्यार्थी नोकरी करत अभ्यास करतात किंवा काही जण पूर्णवेळ स्पर्धापरीक्षेचाच अभ्यास करतात. या सर्वांत एमपीएससीची परीक्षा म्हणजे एक प्रक्रिया आहे हे समजून घेतले पाहिजे आणि त्या प्रक्रियेवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. एमपीएससी मध्ये फॅक्च्युअल प्रश्न विचारले जातात. साहाजिकच उत्तरं बदलण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना तिथे थोडा अविश्वास वाटू लागतो. मात्र बदल हे होतच राहणार आहेत. एमपीएससी विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन साध्या पदवीधारकाला उच्च पदावर बसून समाजाची सेवा करण्यासाठी, त्यांच्यावर प्रभाव पाडण्याची जी संधी देऊ करते त्या प्रक्रियेवरचा विश्वास विद्यार्थ्यांनी ढळू देता कामा नये. 

एमपीएससीची प्रक्रिया समजून घेताना

एमपीएससी ही एक प्रक्रिया आहे त्यामध्ये काही चांगल्या बाजू आणि कमतरता असणार आहेत. एमपीएससीच्या प्रक्रियेत काही बदल, सुधारणा होत आहेतच. विद्यार्थ्यांनी एक गोष्ट कायमच लक्षात ठेवलं पाहिजे की कोणतीही प्रक्रिया किंवा पद्धती किंवा माणूस परफेक्ट नसतो. त्यामुळे काही कमतरता राहाणार ते मान्यच करायला हवे. मात्र प्रक्रियेवर विश्वास ठेवला तरच जाणवणाऱ्या अडचणीतून मार्ग काढता येईल. 

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनो स्वतःची ताकद ओळखा

एमपीएससी तथ्य किंवा फॅक्टवर आधारित आहे हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हाही त्या प्रक्रियेवरचा विश्वास ढळता उपयोगी नाही. एमपीएससी जरी फॅक्च्युअल असली तरी त्यात बऱ्यापैकी लवचिकताही असते. एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक विद्यार्थी हा काही प्रत्येक विषयात अव्वल नसतो. त्यामुळे एमपीएससी करताना प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज वापरतो. त्या त्या स्ट्रॅटेजीनुसार विद्यार्थी अभ्यास करून ते अव्वल येतात. पण ही लवचिकता एमपीएससी मध्ये आहे त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने आपली ताकद ओळखली पाहिजे. 

स्पर्धा खूप जास्त आहे.

एमपीएससी ही दोन तीन वर्ष चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे अभ्यासाचे नियोजन हे सर्वात महत्त्वाचे आहे. परीक्षेच्या आधी दोन तीन महिने अभ्यास ही पद्धत किमान एमपीएससी ला तरी लागू होणार नाही. एमपीएससीची परीक्षा देण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास करणं तशी सवय लावून घेणं हे अत्यंत गरजेचे आहे. या परीक्षेत एक एक मार्क अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तेवढी स्पर्धा तगडी असते. एखाद्या मार्काने पोस्ट जाते किंवा परीक्षाही परत द्यावी लागते. त्यामुळे हा मार्क मिळवताना सातत्यपूर्ण अभ्यास हीच त्याची किल्ली असेल. 

अभ्यासक्रम नीट पहावा.

एमपीएससी मध्ये वेगवेगळे विषय असतात, त्याला गुणांकन ठरलेले असते. त्यामुळे केवळ आपल्या आवडीचा विषय घेऊन त्याचा अभ्यास करण्यापेक्षा संपूर्ण अभ्यासक्रम व्यवस्थित केला जाईल याची खात्री करायला हवी. कोणत्या विषयाला किती महत्त्व आहे हे ओळखून त्यानुसार अभ्यास केला तर परीक्षा कशी द्यायची हे कळू शकते. यासाठी दोन गोष्टी करायला हव्या त्या म्हणजे परिक्षेचा अभ्यास योग्य प्रकारे समजून घ्या आणि मागच्या परीक्षांचे पेपर्स सोडवा. पेपर्स वरून अभ्यासात कोणत्या विषयाला कसे गुण आहेत हे समजून येते. त्यानुसार नियोजन करून परीक्षेचा अभ्यास करायला हवा. 

एमपीएससी मधून समाजाची सेवा

एमपीएससी ही परीक्षा आपल्याला समाजाला मदत करण्यासाठीची संधी देतात. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखल्या पाहिजेत, नव्या गोष्टी ज्या तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी गरजेच्या आहेत त्या शिकल्या पाहिजेत. दैनंदिन आयुष्यात काही गोष्टींवर नियमित फोकस केला तर नव्या गोष्टी आत्मसात करणे उदा. इंग्रजी भाषा अवगत करणे सहज शक्य होतात. स्वतःला वेळ देणे फार महत्त्वाचे आहे त्यातूनच आपण सक्षम होऊन इतरांचे प्रश्न सोडवणे त्यांना मदत करणे शक्य होऊ शकते.

एमपीएससी करताना आत्मसंतुष्ट राहू नका आपल्या लक्ष्यापेक्षा थोडेही कमी गोष्टीत समाधान मानू नका. 


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole