मिठी मारणं आहे फायदेशीर. आपल्या लोकांना मिठी मारल्याने होणारा लाभ जाणून घ्या.

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा सिनेमा सर्वांनी पाहिला असेलच. खूप मनोरंजक आहे, त्यामूळे टिव्हीवर लागेल तेव्हा आवर्जुन संपूर्ण पाहिला जातो. यांत विनोदाबरोबरच एक मनाच्या जवळची गोष्ट आहे, ती म्हणजे ‘जादू की झप्पी'(Jadu ki jhappi). आपल्या माणसाला भेटण्यासाठी असलेल्या प्रेमळ मिठीचं हे अजूनच गोड नाव. केवळ शारीरिक जवळीक इतकाच याचा सीमीत अर्थ नाही तर मिठी ही खरोखरीच जादुई गोष्ट आहे. वेळ आनंदाची असो किंवा दु:खाची…पण दोन्ही वेळेस जे शब्दांनी साधत नाही ते या मिठीनं साधतं. ही झप्पी अशी कशी जादुई आहे? मिठी मारण्यचे फायदे (Benefits of hugging) हे या लेखाच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे.

१. मिठी तुम्हाला अधिक आनंदी बनवू शकते

ऑक्सिटोसिन हे आपल्या शरीरातील एक संप्रेरक (Hormone) आहे ज्याला शास्त्रज्ञ कधीकधी “कडल हार्मोन” म्हणतात. याचे कारण असे की जेव्हा आपण एखाद्याला मिठी मारतो, स्पर्श करतो किंवा त्याच्या जवळ बसतो तेव्हा त्याची पातळी वाढते. ऑक्सिटोसिन आनंद आणि  तणाव हटवण्याशी संबंधित आहे. शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की या संप्रेरकाचा महिलांमध्ये तीव्र प्रभाव आहे. ऑक्सिटोसिनमुळे रक्तदाब आणि ताण आणणारे संप्रेरक नॉरपेनेफ्रिन कमी होते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की ऑक्सिटोसिनचे सकारात्मक फायदे त्यांच्या रोमँटिक जोडीदारासोबत चांगले संबंध असलेल्या आणि वारंवार मिठी मारणाऱ्या स्त्रियांमध्ये सर्वात चांगल्या प्रकारे आढळून आले आहेत. स्त्रिया जेव्हा त्यांच्या अर्भकांना जवळ घेतात तेव्हा त्यांना ऑक्सिटोसिनचे सकारात्मक परिणाम देखील दिसले.

२.  मिठी आपल्या हृदयाच्या आरोग्यास चालना देऊ शकते

मिठी मारणे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असू शकते. एका अभ्यासा दरम्यान, शास्त्रज्ञांनी सुमारे २०० प्रौढांच्या गटाला दोन गटांमध्ये विभागले. एका गटाने रोमँटिक भागीदारांनी १० मिनिटे हात धरले होते आणि त्यानंतर २० सेकंद एकमेकांना मिठी मारली होती. दुसर्‍या गटात रोमँटिक भागीदार होते जे १० मिनिटे आणि २० सेकंद शांतपणे बसले. पहिल्या गटातील लोकांमध्ये दुसऱ्या गटाच्या तुलनेत रक्तदाब पातळी आणि हृदय गती कमी झाल्याचे दिसून आले. या निष्कर्षांनुसार, प्रेमळ नाते तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असू शकते.

३. मिठीमुळे रोगप्रतिकारकशक्तीमध्ये होते सुधारणा

याला बादरायण संबंध म्हणलं जाईल परंतु हे खरं आहे की मिठी मारण्याचा रोगप्रतिकारक्षमतेशी संबंध आहे. आपल्या शरीरात तणावामुळे एक संप्रेरक स्त्री जातं, त्यांचं नाव आहे कॉर्टीसॉल. हे कॉर्टीसॉल आपल्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्तीला घटवण्याचं काम करतं म्हणून मिठी मारल्यानं या स्त्रवलेल्या कॉर्टीसॉलचं प्रमाण कमी होतं आणि आपली रोगप्रतिकारकशक्ती लवकर सुधारण्यास मदत होते. म्हणून आजारी माणसाला तर जादू की झप्पी मिळाली पाहिजे.

४. मिठी तुमची भीती कमी करण्यास मदत करते

शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की स्पर्शाने कमी आत्मसन्मान असलेल्या लोकांमध्ये चिंता कमी होऊ शकते. स्पर्शामुळे लोकांना जेव्हा मरणाचं भय वाटतं त्या ह्यापासून दूर राहण्यासाठी देखील मिठी उपयोगाला येते. त्यांना असे आढळून आले की एखाद्या निर्जीव वस्तूला देखील मिठी मारल्याने – उदा. टेडी बेअर लोकांची भीती कमी करण्यास मदत होते. यावरून झप्पी जादुई कशी आहे याची माहिती आपल्याला आता समजली असेल. तर अशीही जादुई की झप्पी देत रहा आणि घेत रहा.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole