स्त्रियांनी आकर्षक होण्यासाठी लावून घेतल्याच पाहिजेत या फायदेशीर सवयी

१ .तुम्ही किती छान दिसता किंवा तुम्ही छान पेहराव करून वावरता यावरून तुम्ही किती आकर्षक आहात हे ठरवता येत नाही. तुमचा आकर्षकपणा हा तुमच्या व्यक्तिमत्वानुसार ठरवला जातो. तुमच्या उपस्थितीने आसपास सकारात्मकता येते का? लोकांना आपला सहवास हवाहवासा वाटतो का? तुमच्या टापटीप राहण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे तुम्ही आकर्षक आहात असं मानलं जात. पण यासाठी काही सवयी लावून घेणं गरजेचं आहे. (Good habits to become attractive)

२. सदा चिंतातूर (Panic) असणारी महिला ही आकर्षक वाटण्यापेक्षा ज्या महिलेकडे योग्य आत्मविश्वास असेल, त्यामुळे तिचा विश्वासपूर्वक असणारा वावर यामुळे तिचं देखणेपण वेगळंच असतं. तिचा पेहराव, तिचं रूप या गोष्टींना महत्व देण्याची गरज वाटत नाही.

३. जेव्हा संधी मिळेल त्यानुसार आपल्या ज्ञानात भर पडेल असं काहीतरी करणे. नवीन शिकण्याचा (Learning something new) उत्साह, जिद्द असणे. ते शिकण्यासाठी सदैव तयार असणे आणि शिकून पूर्ण करणे या गुणांमुळे व्यक्ती स्मार्ट म्हणून ओळखल्या जातात.

४. आपल्या कक्षा विस्तारत असताना कशाला होकार द्यावा आणि कशाला नाकारावं (Say no) हे कळणं म्हणजे व्यक्ती स्मार्ट आहे, असं म्हणायला हवं. तुम्हाला लोक गृहीत धरून राहतात. जे आपल्याला पटत नाही, त्याला भीडभाड न ठेवता नकार देणं गरजेचं असतं. कारण महिलांना हे करणं अवघड होतं. म्हणून त्यांनी यांवर लक्ष द्यायला हवा.

५. व्यायाम (Daily Exercise) हा फार महत्वाचा आहे. तुम्हांला शारीरिक समस्या कमी होतात आणि यामुळे आपलं आरोग्य नीट राहतं. आपण अधिक सकारात्मक आणि उर्जावान होतो. चेहरा खूप तेजस्वी होतो. आपल्या व्यक्तिमत्वाला चांगले पैलू पडतात आणि व्यक्तिमत्व अधिक आकर्षक होतं. 

६.  तुम्हाला आकर्षक होण्यासाठी स्वतःमध्ये आवश्यक ते बदल (Change yourself) करावे लागणार पण त्यासाठी स्वतःला स्वतःच्या प्रगतीसाठी वेळ देणं महत्वाचं आहे. पण महिला जेवढा कुटुंबासाठी जितका वेळ देतात तितका स्वतःला दिला तर व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होतात.

७. जीवनात प्रगती करताना जबाबदाऱ्या (Responsibilities) वाढत असतात. पण कोणत्याही जबाबदाऱ्या पार पाडणं गरजेचं असतं. तसेच ते आव्हानात्मक असतं. घाबरून जाणं आणि जबाबदाऱ्यांपासून परावृत्त होणं यामुळे यश मिळत नाही. जबाबदारी पार पाडणं आणि त्यातून यश मिळवणं हे तुमचं व्यक्तीमत्व खुलवतं. यशस्वी व्यक्तीमत्व अधिक आकर्षक असतात.

८. ज्या महिलेकडे सकारात्मकता (Positivity) आहे, ती ताण- तणावात असत नाही. ती प्रफुल्लित असते, उत्साही असते. भोवतालचं वातावरण सकारात्मक करते. त्यामुळे ती व्यक्तीचा संपर्कात यावं असं सगळ्यांना वाटतं.  

९. ज्या व्यक्ती सर्वांमध्ये मिळून मिसळून राहतात आणि अन्य लोकांनी आपल्याला मिसळून घ्यावं यासाठी त्या बढाया मारणं, अहंकार (Ego) दाखवणं, दुसऱ्यांना कमी लेखणं अशा गोष्टी करत नाहीत. यापेक्षा त्या व्यक्ती दुसऱ्यांना प्रोत्साहन (motivation) देण्याचं काम करतात. म्हणून बाकी लोकांना त्यांच्या सहवासाचा यामुळे त्रास न होता सहवास हवाहवासा वाटतो.

१०. उद्याची काळजी विनाकारण करू नये आणि कालच्या घडून गेलेल्या वाईट गोष्टींची सतत उजळणी करून दुःख करत राहू नये. अशा माणसांचा  संपर्क नकोसा होतो. सदैव  वर्तमानकाळात जगावं. (Live in a present moment) असं जगणाऱ्या व्यक्तींचं लक्ष आपल्या ध्येयावर अधिक केंद्रित असतं, त्या उत्साही असतात आणि प्रसिद्ध होतात.

११. लोक ‘पोटात एक आणि ओठात एक’ अशा स्वभावाच्या व्यक्तींना सामावून घेत नाहीत. आपण जसे आहोत, तसे सद्गुण व दोषांसह स्वतःला लोकांच्या समोर आणलं तर तुमच्या सच्चेपणामुळे तुम्ही खास बनता.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole