व्यवसायातील लाचखोरीसंबंधीच्या जागतिक यादीत भारत 77व्या स्थानी!

भारत 45 गुणांसह व्यवसायातील लाचखोरीसंबंधीच्या 2020 (Global Bribery Risk Matrix) च्या जागतिक यादीत 77व्या स्थानी आहे. गेल्या वर्षी या यादीत देशाचा 48 गुणांसह 78वा क्रमांक होता. ‘ट्रेस’ या लाचलुचपत प्रतिबंधक मानक निश्चिती संस्थेने (anti-bribery standard setting organisation) केलेल्या 194 देश, प्रांत, स्वायत्त आणि अर्धस्वायत्त प्रदेशांतील व्यवसाय लाचखोरी जोखमीच्या मूल्यांकनातून हे अनुमान पुढे आले आहे.

‘TRACE’ 2020 च्या Global Bribery Risk Matrix नोंदीनुसार..

  • उत्तर कोरिया, तुर्कमेनिस्तान, दक्षिण सुदान, वेनेझुएला आणि एरिट्रियामध्ये लाचखोरीचा सर्वाधिक धोका आढळून आला.
  • डेन्मार्क, नॉर्वे, फिनलँड, स्वीडन आणि न्यूझीलंड हे याबाबतीत सर्वांत कमी जोखमीचे देश ठरले.
  • सरकारसोबतचे व्यावसायिक संबंध, लाचलुचपत प्रतिबंध प्रणाली व अंमलबजावणी, सरकार व नागरीसेवा पारदर्शकता आणि माध्यमांच्या भूमिकेसह नागरी समाज निरीक्षणाची क्षमता या 4 घटकांना केंद्रस्थानी ठेवून हे मूल्यांकन केले जाते.

पाकिस्तान, चीन, नेपाळ आणि बांगलादेश या शेजारी देशांच्या तुलनेत भारताची कामगिरी चांगली आहे. यापैकी चीनने सततच्या देखरेखीसह सरकारी अधिकाऱ्यांचे लाचखोरीचे प्रमाण बऱ्यापैकी घटवल्याचे ‘ट्रेस’ आकडेवारी सांगते. दरम्यान, भूतान 37 गुणांसह 48 व्या स्थानी आहे, तर भारताव्यतिरिक्त पेरू, जॉर्डन, उत्तर मॅसेडोनिया, कोलंबिया आणि माँटेनेग्रो यांच्या खात्यावरही प्रत्येकी 45 गुण आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole