पहिल्याच प्रयत्नात IPS झालेल्या गरिमाने पुन्हा परीक्षा दिली आणि IAS होऊन दाखवलं

गरिमा अग्रवाल ही विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत बनली आहे. हिंदी मिडीयम मधून शिकलेली, छोट्याशा गावात राहणारी आणि सर्वसामान्य कुटुंब असणाऱ्या गरिमाची प्रेरणादायक गोष्ट.

UPSC हि भारतातील सर्वात अवघड परीक्षांमधली एक मानली जाते. कित्येक लोक या परीक्षेमध्ये अनेक वेळा प्रयत्न करून देखील असफल होतात. परंतु असेही काही रत्न असतात जे अथक परिश्रमाद्वारे या यूपीएससीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवतात.

दरवर्षी या परीक्षेसाठी लाखो फॉर्म भरले जातात परंतु काही मोजकेच विद्यार्थी पास होतात ज्यांनी ह्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी भरपूर सराव आणि भरपूर अभ्यास केलेला आहे.

अशीच एक विद्यार्थीनी आहे गरिमा अग्रवाल (Garima Agrawal, AIR 40, UPSC CSE 2018) जिने आपल्या मेहनतीच्या जोरावर यूपीएससीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादित केले. गरिमा आज एक IAS ऑफिसर बनली आहे.

गरिमा अग्रवाल, प्रेरणास्त्रोत, प्रेरणादायक गोष्ट, Marathi Motivation, UPSC, IAS, IPS, MPSC, IAS Garima Agrawal, Success Stories

गरिमा अग्रवाल मध्यप्रदेश मधील खरगोन या छोट्याशा गावात राहते. तिची घरची परिस्थिती बघितली तर आपल्याला हे कळून येईल की ती किती संघर्ष करून इथपर्यंत पोहोचली आहे. सहजपणे कुणालाही यश मिळत नसते. कितीतरी संघर्ष केल्यानंतर गरिमा आज IAS ऑफिसर बनली आहे.

गरिमा ही विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत बनली आहे. गरिमाने हिंदी मिडीयम द्वारे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. तिचे सर्व प्राथमिक शिक्षण तिच्या गावातूनच पूर्ण झाले होते.

लहानपणापासूनच हुशार असलेल्या गरिमाला दहावीमध्ये 92% मिळाले तर बारावीमध्ये 89 % मिळाले. एवढेच नाही तर तिच्या ह्या उत्कृष्ट निकालामुळे तिला रोटरी इंटरनॅशनल युथ एक्सचेंज प्रोग्राम कडून एका वर्षासाठी हायर सेकंडरी एज्युकेशन मिनिसोटा, अमेरिका येथून पूर्ण करण्याची संधी मिळाली.

गरिमाची आई किरण अग्रवाल एक गृहिणी असून तिचे वडील कल्याण अग्रवाल एक व्यवसायिक आणि समाजसेवक आहेत. गरिमाची मोठी बहीण प्रीती अग्रवालने 2013 मध्ये युपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले होते. ती सध्या इंडियन पोस्टल सर्व्हिस मध्ये कार्यरत आहे.

पहिल्याच प्रयत्नात बनली IPS:

आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर गरिमाने JEE ही परीक्षा दिली आणि ती सिलेक्ट देखील झाली. गरिमाने IIT हैद्राबाद मधून ग्रॅज्युएशन केले असून जर्मनीतून इंटर्नशिप केली आहे. तेथे तिला नोकरीसाठी एक ऑफर देखील आली होती.

परंतु लहानपणापासूनच समाजसेवा करायची गरीमाची इच्छा होती, त्यामुळे तिने त्या नोकरीस नकार दिला. गरिमाने जवळपास दीड वर्ष परीक्षेची तयारी केली.

2017 मध्ये पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा गरिमाने दिली आणि पहिल्याच प्रयत्नात सिलेक्ट देखील झाली. देशात गरिमाचा 241 वा रँक आला होता आणि ती IPS झालेली होती. गरिमा आपल्याला मिळालेल्या सफलतेवर संतुष्ट होती परंतु तिला IPS ऐवजी IAS बनण्यात जास्त रुची होती.

तिने आयपीएसची ट्रेनिंग जॉईन केली परंतु पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्यामुळे तिने IAS बनण्यासाठी परीक्षेची देखील तयारी सुरू ठेवली. तिने परत परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

तिच्या जिद्दीच्या आणि मेहनतीचा जोरावर तिने 2018 मध्ये फक्त यूपीएससीची परीक्षा पास नव्हती केली तर देशात 40 वा रँक देखील मिळवला होता. तिचे लहानपणापासूनचे आयएएस बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले होते.

गरिमा अग्रवाल, प्रेरणास्त्रोत, प्रेरणादायक गोष्ट, Marathi Motivation, UPSC, IAS, IPS, MPSC, IAS Garima Agrawal, Success Stories

सोशल मीडिया पासून घेतला होता सन्यास

गरिमाची सफलता सर्वांनाच दिसते परंतु या मागील घेतलेला संघर्ष, दिवस-रात्र केलेली मेहनत मात्र सगळ्यांना नाही दिसत. हिंदी माध्यमातून शिकलेल्या गरिमाला इंग्रजी वाचण्यास आणि लिहिण्यास खूपच समस्या उद्भवत असे. परंतु तिने अभ्यासाच्या जोरावर इंग्रजीला देखील काबीज केले.

गरिमा अग्रवाल असे सांगते की अभ्यास करते वेळी मन विचलित होऊ नये म्हणून तिने दोन वर्षापर्यंत सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले होते. तिचा संपूर्ण फोकस अभ्यासावर होता.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole