काय असावं फळांसोबतचं उत्कृष्ट मिश्रण? कोणतं फळ खावं कशासोबत?

एक सफरचंद रोज खाल्लं तर डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही अशा अर्थाची एक इंग्रजी भाषेतील म्हण आपण ऐकली असेलच. फळ खूपच महत्वाची आहेत कारण फळांमध्ये जीवनसत्वे (Vitamins), तंतुमय पदार्थ (Fiber), ॲण्टीऑक्सिडंट्स (Antioxidants) अशी पोषणतत्वे असतात. म्हणून दररोज फळांचं सेवन करायला हवं. पण तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून फळांचं सेवन केलं जातं तरीही काही फरक पडत नाही. असं का होतं? कारण आपल्याला कशासोबत कोणतं फळ खावं याची कल्पना नसते.

कोणत्या पदार्थांसोबत कोणती फळं खावीत याची माहितीच आपल्याला आता घ्यायची आहे. कारण यामुळे आपल्याला त्यातली पोषणमुल्ये पूर्णपणे मिळतील. काय आहेत ही उत्कृष्ट कॉम्बिनेशन (Best combination of food items have to eaten) लेखात सांगितलेली आहेत शेवटपर्यंत वाचा…  

कोणता पदार्थ कोणत्या फळासोबत आहे योग्य? 

१. बीट खावं हरभऱ्यासोबत 

बीट हा खनिजांचा एक उत्तम स्त्रोत आहे. यांत मॅग्नेशियम (Magnesium) मोठ्या प्रमाणावर असतं. पण हे  हेच मॅग्नेशियम आपल्या शरीराला शोषून घ्यावं लागतं. आता हे शोषून घेण्याचं काम करतं ते ब ६ जीवनसत्व (Vitamin B 6).  याचा स्त्रोत आहे तो हरभरा म्हणून बीटासोबत हरभरा खावा. 

२. टोमॅटोच्याबरोबर ॲव्हाकॅडो खावं.

लालभडक टोमॅटो रक्तवाढीबरोबरच अजून एका घटकामुळे महत्वाचं ठरतो. टोमॅटोमध्ये कर्करोगाशी दोन हात करणारा महत्वाचा घटक असतो, लायकॉपीन (Lycopene) असं त्याचं नाव आहे. पण ॲव्हाकॅडो खाल्याने या लायकॉपीनची शक्ती वाढते. कारण या ॲव्हाकॅडोमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात, ज्यामुळे लायकॉपीनचा शरीरावर अपेक्षित प्रभाव पडतो.

३. सफरचंदासोबत पीनट बटर

पीनट बटर म्हणजे शेंगदाण्यापासून बनवलेले बटर. शेंगदाणे खाल्याने भरपूर प्रमाणात प्रथिने (Proteins) मिळतात. सफरचंदामध्ये कर्बोदके (Carbohydrates) आणि तंतुमय पदार्थ (Fiber) मिळतात. 

४. डार्क चॉकलेट 

डार्क चॉकलेट (Dark chocolate) एक तब्येतीसाठी चांगलं समजलं जातं. वजन कमी करण्यासाठी डार्क चॉकलेटचं सेवन केलं जातं. ॲण्टीऑक्सिडंट्सही सफरचंदामधून आपल्याला मिळतात. त्याचबरोबर सूज कमी करण्याचेही गुणधर्मही आहेत. या दोघांमुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याचा त्रास खूप कमी होतो. रक्तपुरवठा व्यवस्थित होण्यासाठीही याचा चांगला फायदा होतो. 


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole