जेवण बनवताना तोंड काळसर होऊन जाते, त्यासाठी करा हे हे उपाय

आपल्याकडे स्वयंपाकघर हा महिलांचा प्रांत समजला जातो. आताच्या काळात केवळ चूल आणि मुल या संकल्पनेतून महिला वर्ग बाहेर पडत चालला आहे. परंतु स्वयंपाकघरात आजही स्त्रियाच जेवण बनवतात. शेगडीजवळचं वातावरण साहजिकच गरम असतं पण स्वयंपाक करताना या महिलावर्गाला उकडून हैराण होतं. घाम निथळत असतो, चेहरा काळवंडतो. सणावाराला तर त्यांना खूपच अवघड होऊन जातं.

स्वयंपाकासोबत घरात बाकीही कामेही त्यांना करावी लागतात. त्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून काही उपाय आहेत. स्वयंपाकघरात घरात काम करताना चेहरा काळा होणार नाही आणि त्यांची ही कामे झटपट आवारतील अशा काही उपाय योजना आहेत. त्या काय आहेत?(Easy solutions for working in a kitchen) हे जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचायला हवा.

भांडी झाकून पदार्थ बनवावेत.

ज्या भांड्यात पदार्थ बनवायचा आहे ते भांडे शेगडीवर झाकूनच (Cover a pot while cooking) पदार्थ बनवावा. यामुळे लागणाऱ्या गॅसचं प्रमाण कमी असेल आणि झाकल्यानंतर तयार झालेल्या दबावामुळे पदार्थ कमी वेळात तयार होईल. अजून एक गोष्ट म्हणजे गरमीचा त्रास जाणवणार नाही. तसेच काही गोष्टी आधीच गरम केल्यात तर शिजायला वेळ कमी लागतो, यामुळे वेळ कमी लागेल. म्हणून हा पर्याय योग्य आहे. 

योजनाबद्ध पद्धतीने काम करावं. 

महिलांना तयार होण्यासाठी वेळ लागतो अशी ओरड ऐकू येत असते. कारण त्यांना सुंदर दिसण्यासाठी मेकअप करायचा असतो. पण मेकअप झाल्यावर काम करणं अवघड होऊन जातं. म्हणून कामाच्या वेळा ठरवून घ्याव्यात. नियोजनानुसार जर काम केलं तर पटापट संपून जाईल. कारण गडबडीत काम करताना सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून करणं सोपं नाही. बरंच काही विसरून जातं, म्हणून जेव्हा कामाची गडबड असणार आहे, तेव्हा कामाचा योग्य क्रम लावून यादी बनवून त्याचं नियोजन (Proper planning of working in a kitchen) करायला हवं.

ओव्हन वापरावा…

शेगडी वापरळी गेल्यामुळे गरम होणारच. उष्णतेचा सामना करायला लागू नये म्हणून ओव्हनचा वापर (Use of Oven) करणं सोयीचं आहे. याचा अजून एक फायदा होईल की वेळ वाचेल. आपल्याला अन्न शिजवायला जितका वेळ लागेल त्याहून कमी वेळ ओव्हन मध्ये लागेल. म्हणूनच शक्यतो ओव्हनमध्ये जे पदार्थ सहजतेने बनतील, असेच बनवण्याचा प्रयत्न करावा.  

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole