हे आयुर्वेदिक उपाय करा आणि पाळीच्या दुखण्यावर व पित्ताच्या जळजळीवर मिळवा आराम

तब्येतीची काही ना काही कुरबुर असते. एकदम दवाखान्याची पायरी चढण्याची आवश्यकता नाही परंतु त्याचा त्रास जाणवतो, अशा छोट्या छोट्या आरोग्याच्या तक्रारी असतात. या तक्रारींमुळे आपलं वेळापत्रक आणि मनस्थिती या दोन्ही गोष्टी बिघडतात. मुत्रमार्गात जळजळणं, पित्त खवळणं, मासिक पाळीच्या वेदना, हात पाय भगभगणं; हे का होतं हे कळत नाही आणि यांवर उपाय काय करावा? हे ही समजून येत नाही. आपल्याला यांचे उपाय काय असावेत हे आयुर्वेद सांगतो. आयुर्वेद तज्ज्ञांनी या छोट्या छोट्या समस्यांवर काही उपाय सांगितले आहेत जे घरबसल्या (Easy Ayurvedic Home remedies for common health problems) सहज करता येऊ शकतात. आपण त्याबद्दल जाणून घेऊयात.

मनुक्याचं पाणी

द्राक्षे ही दोन प्रकारची असतात. पण काळ्या द्राक्षाचे मनुके जास्त उपयुक्त असतात. पित्त उसळल्यानंतर होणाऱ्या समस्या, पाळीमध्ये होणाऱ्या वेदना-रक्तस्त्राव, केसांचं गळणं, रक्त कमी असणं यासाठी हे काळे मनुके फायदेशीर असतात. काळे मनुके हा ॲण्टिऑक्सिडण्ट्सचा उत्तम स्त्रोत आहे. उष्णता कमी होण्यासाठी याचा उपयोग होतो. मलावरोध टाळण्यासाठी आणि उर्जावान होण्यासाठी आपण काळया मनुक्याचे सेवन करणं गरजेचं आहे. तज्ज्ञ सांगतात की १०-१५ काळे मनुके नीट धुवून रात्रभर पेलाभर पाण्यात भिजवून ठेवावेत. सकाळी उठल्यानंतर ते पाण्यातच चुरडून मिसळावेत आणि हे पाणी (Black Raisins water) प्यावं. याचा खूप लाभ होतो. आपल्याला गार वाटायला लागेल. किंवा खाण्याआधी अंदाजे पाऊण तास जर हे पाणी प्यायलं की फायदा होतो. 

तांदळाचं पाणी

तांदूळ शिजतो तेव्हा चिकट होतो याचं कारण यात असलेला एक घटक स्टार्चमुळे (Starch). तांदळाचं पाणी म्हणजे ॲण्टिऑक्सिडण्ट्सचा खजिना. लघवीच्या जागांची होणारी जळजळ, पोट बिघडणे, पांढरं जाणं, रक्त प्रवाह सुरळीत करण्यासाठी हे तांदळाचं पाणी (Rice water) खूप उपयोगी आहे. या पाण्याने चेहरा आणि केस धुतले तर त्वचा, केस अधिक चमकदार होतात. यात असलेल्या स्टार्च आणि ॲण्टिऑक्सिडण्ट्समुळे हे पाणी लाभदायक ठरतं. साधारणतः एक वाटी तांदूळ घेऊन हे पाणी तयार करता येतं. एक वाटी तांदूळ घेऊन त्यात अंदाजे अर्धा कप पाणी घालावं. ५-७ तास तांदूळ भिजत घालावेत आणि ते भांडं झाकून ठेवावं. साधारण ७ तासांनंतर हे पाणी गाळून घ्यावं आणि प्यावं. 

बडीशेपेचे पाणी

जेवण झालं की बडीशेप आवर्जून खाल्ली जाते कारण उत्तम पचनासाठी बडीशेप खूपच उपयोगी आहे. माऊथफ्रेशनर हा शब्द बडीशेपेसाठी आवर्जून वापरला जातो. बडीशेप ऊर्जा देणारी आहे. पाळीच्या वेदनांची तीव्रता कमी होण्यासाठी, चांगल्या प्रतिकारकक्षमतेसाठी, हृदयाचं कामकाज उत्तम राहण्यासाठी बडीशेपेचं पाणी (Fennel seeds water) प्यायला हवं. एका ग्लासात थंड पाणी घ्यावं. त्यात एक चमचा बडीशेप घालावी. बडेशेपेची पूड असेल तर उत्तमच.  गरज असेल तर त्यात थोडीशी साखर घातली तरी चालेल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. हे जेवणानंतर प्यायल्याने फायदा होतो. 


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole