करा हे उपाय..  कमी होईल सांधेदुखी…  

मानवी शरीरात हाडे एकमेकांना जोडलेली आहेत, त्याला सांधे म्हणतात. वयोमानपरत्वे सांध्यांमध्ये वेदना जाणवायला लागतात. संध्यांमधली सहजता कमी होते. पुढे जाऊन कदाचित संधिवातही (Arthritis)  होतो. भरपूर प्रकारचे संधिवात आढळून येतात. संधिवाताच्या मुळाशी वेगवेगळी कारणे आहेत. 

संधिवात हा विकार आहे. सांध्यांमध्ये होणाऱ्या वेदना, दाह होणे तसेच सांध्यांची  हालचाल करणं अवघड होतं. कोपरे, खांदे, गुडघे, खुबा अशा ठिकाणी याचा प्रभाव पडतो, आणि फिरायला त्रास होतो.  

तज्ज्ञ म्हणतात की संधिवात असणाऱ्या प्रत्येकाला तपासून त्याच्या कारणांचा अभ्यास केलं असता आपल्याला हे कळून येईल की प्रत्येकाचं कारण हे वेगवेगळं आहे. पण काही सामान्यतः अशी कारणं जी या विकार झालेल्या माणसांच्या अभ्यासात आढळून येतात. (Different reasons and home remedies for Arthritis) 

संधिवात यामुळे होऊ शकतो.

१. जीवाणूंच्या संसर्गामुळेही संधिवात होतो, असं आढळून आलं आहे. शरीरात जीवाणूंची लागण हळूहळू सर्वत्र होत जाते, जेव्हा सांध्यांच्या मध्ये जीवाणूंची वाढ होते, तेव्हा संधिवाताची सुरुवात होते. शरीरावर व्रण, जखमा जर उघड्या राहिल्या तर तिथून जीवाणूंना शरीरात जाण्याची संधी मिळते.

२. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत हा आजार पोहोचतो. अनुवंशिकतेने संधिवात होतो, हे सुद्धा अभ्यासातून समोर आलं आहे.  

३. पोषणातील त्रुटी – आपल्या शरीराला विविध पोषणमुल्ये आवश्यक असतात. याच्या कमतरतेमुळे ड जीवनसत्व (Vitamin D) मॅग्नेशियम सारखी खनिजे जर आपल्याला योग्य प्रमाणात नाही मिळाली तर संधिवात होण्याची शक्यता असते.  

४. ग्लूटेन (Gluten) हा घटक गव्हामध्ये आढळतो. परंतु काही व्यक्ती सहा असतात की ज्यांना ग्लूटेनचं सेवन केल्यामुळे पोटात वेदना होतात. यापुढे जाऊन सेलियाक (Celiac Disease) नावाचा आजार झाला असेल त्यांना तर ग्लूटेन खाऊच नये असं सांगितलं जातं, त्या लोकांना संधिवात होऊ शकतो.

५. आपली रोगप्रतिकारक शक्तीच कधीकधी आपल्या विरोधात काम करू लागते. यातून बरेच आजार होऊ शकतात. संधिवात ही त्यापैकी एक आहे. 

सध्याच्या काळात मोठ्या संख्येने लोकांना संधिवात होताना दिसतो. पण या आजाराबद्दल लोक चुकीच्या समजुती पसरवताना दिसतात. त्याचीही काही उदाहरणे समजून घेऊयात. 

६. कोणत्याही संध्याच्या ठिकाणी जर काही इजा झाली असेल आणि तिथे वेदना होत असतील याचा अर्थ संधिवाताची सुरुवात आहे, असा नसतो. योग्य व्यायाम केला असता वेदना नकीच कमी होऊ शकतात.

– बर्फ किंवा गरम पाण्याची पिशवी या दोन्ही गोष्टी शेक देण्यासाठी वापरल्या तरीही चालतं. वेदना कमी होतील.

– चालण्याचा व्यायाम करणे, हे आरोग्यासाठी चांगले आहेच पण गुडघ्यांसाठीही खूप उपयोगी  आहे. स्नायू बळकट होतात. वाढलेलं वजन ही कमी होतं.  

 – हाडांच्या वेदना होऊ नयेत म्हणून आपण प्रमाणात आहार घ्यायला हवा. दररोजचा व्यायाम आणि संतुलित आहाराची सवय यामुळे हा त्रास कमी होऊ शकतो. 

– ज्या पदार्थांमुळे सूज येईल, असे पदार्थ खाऊ नयेत. तसेच खूप वेदना होत असतील घरीच उपचार न करता डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत.  


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole