RT-PCR टेस्टमधील CT Value म्हणजे काय? कोरोना रिपोर्टवर याचा काय परिणाम होतो?

काय असते CT Value? तिची मर्यादा अहवालात किती महत्त्वाची आहे?

आपण कोरोनाशी गेले दीडेक वर्षे लढत आहोत, कोरोनाची साथ त्याच्या संबंधी शब्द हे सारखे कानावर पडत असतात. Plasma, Antigen tests, RT-PCR टेस्ट, म्युटेशन हे सगळीकडे बोलले जात आहेत. पण ते नक्की काय आहेत? काय त्यांचा अर्थ? हे प्रश्न सतत पडत असावेत. कोरोनाचा होणारा अचानक उद्रेक, पहिली लाट, दुसरी लाट, चार लाखांच्या घरात गेलेली रुग्णसंख्या कसं होतं असावं हे? कोरोना संसर्ग झाला आहे की नाही हे समजण्यासाठी चाचण्या केल्या जातात.

अॅंटीजेन, आरटीपीसीआर अशी त्यांची नावे आहेत हे आता आपल्याला माहीत आहे. जास्त प्रमाणात ही आरटीपीसीआर चाचणीच केली जाते. त्याचा अहवाल येण्यासाठी २४ ते ४८ तास लागतात. जेंव्हा लाट येते तेंव्हा जास्तीतजास्त लोकांना चाचण्या केल्या जातात, याचा प्रयोगशाळांवर येणारा ताण आपण पहिला आहे. हा अहवाल पाहिला तर काय काय दिसतं? जाणून घेऊयात

RT-PCR म्हणजे काय?

खरंतर आरटीपीसीआर (RT-PCR – Reverse transcription polymerase chain reaction) ही कोरोना संसर्ग समजण्यासाठी खात्रीलायक चाचणी आहे. कारण यामध्ये थेट विषाणूची जनुकीय सामग्रीची तपासणी केली जाते. आपल्याला हे माहीत आहे की कोरोना विषाणूमध्ये आपल्या सारखा डीएनए नसून आरएनए असतो. तोच आरएनए आहे की नाही ते शोधलं जातं. आता हा आरएनए; त्याचा वेगळा अभ्यास करण्याचं तंत्रज्ञान आपल्याकडे नाही. मग आपण काय करतो? डीएनएचा म्हणजे ज्यापासून डीएनए तयार होतो त्या अमायनो असिड्सच्या क्रमाचा अभ्यास करतो. डीएनएमध्ये २ स्ट्रॅंड असलेली एक मोठी एकमेकांत वेढलेली साखळी (polymer) असते. तर आरएनए हा एकच स्ट्रॅंड असलेला तुकडा असतो. या डीएनए पासून ठराविक किंवा अपेक्षित अमायनो असिड्स पाहून त्याचा क्रम अभ्यासण्यासाठी जो भाग तोडला जातो तो आरएनए असतो, या प्रक्रियेला ट्रान्सक्रिप्शन (Transcription) म्हणतात तर आरएनएचा उपयोग करून त्याच्या आधारे जर डीएनए बनवला तर त्याला रिर्वस ट्रान्सक्रिप्शन (Reverse Transcription) म्हणतात.

CT Value म्हणजे काय?

त्याच बरोबर ही सीटी व्हॅल्यूचा ही उल्लेख अहवालात करण्यात आलेला असतो. काय असते सीटी व्हॅल्यू? हे सीटी म्हणजे सायकल थ्रेशोल्ड. जर डीएनए बनवायचा म्हणजे मोठी साखळी (polymerase chain reaction) बनवायची. त्यासाठी आरटीपीसीआर मशीनमध्ये ही प्रक्रिया केली जाते. आधी सांगितल्याप्रमाणे त्यासाठी आरएनएचा आधार घेऊन polymer बनवायला हवा. आता डीएनए बनताना त्याचे वेढे म्हणजे सायकल्स आहेत, त्या वेढ्यांमध्ये हा कोरोना आरएनए किती वेळा सापडतो हे पाहिलं जातं. या प्रक्रियेत एकाचा दोन, दोनाचा चार अशी दुपट्ट होत जाते, यांत कोरोना आरएनए शोधला जातो. या सायकल्स फिरवण्याची जी संख्या आहे त्याची मर्यादा ही शास्त्रज्ञांमार्फत निश्चित करण्यात आली आहे. या सायकल्स ३५ वेळा फिरवल्या आणि यादरम्यान जर कोरोना आरएनए सापडला तर त्या व्यक्तीचा अहवाल हा सकारात्मक (positive) असतो.

आता ही मर्यादा म्हणजे असते सीटी व्हॅल्यू. त्या बद्दल बघू की ही सीटी व्हॅल्यू जितकी कमी असते, तितकी विषाणू आरएनएची संख्या अधिक म्हणजे कमी सायकल्समध्ये हा विषाणूचा आरएनए आढळून आला या आधारावर सर्वसाधारणपणे असं म्हणलं की जातं ‘वायरस लोड’ जास्त आहे. जर ही व्हॅल्यू २३ ते ३५ दरम्यान असेल तर रुग्ण धोकादायक परिस्थितीत नाही असं म्हटलं जातं. आकडा २२ पेक्षा कमी असेल तर काळजी करण्याची आवश्यकता आहे. जर १५ पेक्षा कमी असेल तर ऑक्सिजन लावण्याची तर १० पेक्षा जेंव्हा कमी येतो तेंव्हा अतिदक्षता विभागात दाखल करण्याची गरज असू शकते.

CT Value कमी असल्यास काय करावे ?

ही व्हॅल्यू १० असो नाही तर ३० पण घाबरून न जाता दोन्ही बाबतीत सावध राहणं गरजेचं आहेच. कारण काही डॉक्टरांच्या मताप्रमाणे अहवाल सकारात्मक की नकारात्मक याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण रुग्णाची परिस्थिती ही व्हॅल्यू जास्त असतानाही गंभीर असलेली उदाहरणे आहेत, कारण एकदा का शरीरात गेल्यावर त्याची संख्या वाढत जाणार आहे. संशयिताचा नमुना घेताना त्याची घेण्याची योग्य पद्धत, त्याच्या नाका-तोंडातून स्त्राव घेण्याचं प्रमाण, कधी घेतला आहे तो काळ म्हणजे लागण झाल्यावर लगेच घेतलं आहे की उशीरा; या सगळ्या गोष्टी या सीटी व्हॅल्यूवर परिणाम करतात. त्यामुळे या व्हॅल्यूवर सर्व काही अवलंबून असत नाही. तर रुग्ण अत्यावस्थ होण्यासाठी त्याला मधुमेह, उच्च रक्तदाबासारखे आजार, त्याला वर्तमानात असलेली लक्षणं कारणीभूत असतात. यासाठी एचआरसीटी टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो त्याचा स्कोअर पाहून कोणत्या प्रकारे उपचार करायला हवेत हे ठरवलं जातं.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole