आता XraySetu अँपच्या मदतीने व्हॉट्सअँपवर होणार कोरोनाचे निदान

देशभरात कोरोनाचा प्रभाव हळू हळू कमी होताना दिसत आहे. पण सोबतच तिसऱ्या लाटेचाही धोका आहे. केंद्र सरकारने आता Aarogya Setu नंतर XraySetu नावाचं ऍप लाँच केलं आहे.

या अ‌ॅपच्या मदतीने व्हाट्सअँपवर छातीचा एक्सरे पाठवून कोरोना आहे कि नाही हे कळायला मदत होणार आहे. सध्यातरी ह्या अ‌ॅपसाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही.

XraySetu हे अप्लिकेशन भारत सरकारने Artpark NGO आणि Niramai (हेल्थटेक स्टार्टअप) यांच्यासोबत मिळून तयार केले आहे. ग्रामीण भागात राहणारे लोक ज्यांना सुविधांचा अभाव आहे अश्या लोकांना लक्षात घेऊन हे अ‌ॅप तयार केले गेले आहे.

कसं काम करते XraySetu अ‌ॅप ?

१. छातीचा एक्सरे (Chest Xray) काढून त्याचा आपल्या फोनमध्ये फोटो काढा.

२. एक्सरे सेतू अ‌ॅपच्या मदतीने +91 8046163838 ह्या व्हाट्सअप नंबरवर एक्सरेचा फोटो सेंड करा.

३. XraySetu अ‌ॅप Artificial intelligence च्या मदतीने काही मिनिटातच रिपोर्ट तयार करेल.

४. हा तयार केलेला रिपोर्ट डॉक्टरला सेंड केला जाईल आणि डॉक्टर योग्य सल्ला त्या रिपोर्टमध्ये लिहितील.

५. एक्सपर्ट डॉक्टरांचा सल्ला असलेला रिपोर्ट पेशंटला पुन्हा पाठवला जाईल.

1 Comment
  1. Mrunalipatil says

    Nice

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole