करोना केअर फंड योजने’तून प्रत्येकाला मिळणार ४ हजार? त्या मेसेज मागील सत्य काय?

आपल्या आवडत्या WhatsApp University मधून आता एक नवीन मेसेज फिरत आहे त्यामध्ये असं म्हटलंय कि कोरोना केअर फंड मधून प्रत्येकाला पैसे मिळणार आहेत आणि त्यासोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करून रजिस्टर करण्यास सांगितले आहे.

Covid महामाईच्या काळात अर्थचक्र बंद पडलेले असतानाच्या काळात अनेक आर्थिक फसवणूक करणारे मेसेज फिरत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पैसे मिळण्याचा फिरणारा हा मेसेज त्यातलाच आहे यावर आता पीआयबीने अधिकृत खुलासा केला आहे.

खरंच पैसे मिळणार आहेत का ?

सर्वसामान्यांसाठी संवादाचं प्रभावी माध्यम असलेल्या व्हॉट्स अपवरून केंद्र सरकारकडून प्रत्येकाला पैसे दिले जाणार असल्याचं म्हटलेलं आहे. केंद्र सरकारकडून करोना केअर फंड योजनेच्या माध्यमातून केंद्र प्रत्येक नागरिकाला ४००० रुपयांची मदत देणार असल्याचं या मेसेजमध्ये म्हटलेलं आहे.

या मेसेजवर ‘पीआयबी फॅक्ट चेक’ने व्हायरल होत असलेल्या मेसेजमधील माहितीत तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारे मदत करणार असल्याची कोणतीही केंद्राची योजना नसल्याचं पीआयबी फॅक्ट चेकने म्हटलं आहे.

आपण किंवा आपल्या मित्र परिवाराला याची कल्पना द्या कि संबंधित मेसेज हा खोटा असून, तुम्ही दिलेल्या लिंक वर क्लिक करून रजिस्टर केल्यास तुमची फसवणूक होऊ शकते.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole