BSF Recruitment: सीमा सुरक्षा दलात तब्बल 269 जागांसाठी पदभरती; आजपासून ऑनलाईन अर्ज सुरु

BSF Constable Recruitment 2021 – BSF (BSF Recruitment 2021) म्हणजेच सीमा सुरक्षा दलात (Border Security Force) लवकरच मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तब्बल 269 जागांसाठी ही भरती असणार आहे. कॉन्स्टेबल GD (खेळाडू) या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 असणार आहे.

BSF Constable Recruitment 2021

या पदासाठी भरती

कॉन्स्टेबल GD (खेळाडू) (Constable GD (Sportsmen)) – एकूण जागा  269

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच जाहिरातीत दिलेल्या काही क्रीडा प्रकारांपैकी एका प्रकारात प्राविण्य आणि कौशल्य असणं आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघू शकता.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे 18 ते 23 वर्ष वयोगटातील असणं आवश्यक आहे. तसंच यात SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट, तर  OBC उमेदवारांना 03 वर्षांची सूट मिळणार आहे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://drive.google.com/file/d/1zWcjUDjMWwfvvlCfI6ohv5vZgaDkG5vm/view  या वेबसाईटवर जाऊ शकता.

या पदभरतीसाठी https://projects.bsf.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.


2 Comments
  1. Shivashankar Dhanraj Dhurve says

    Yas

  2. Shivashankar Dhanraj Dhurve says

    Nice bharti

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole