साठून राहिलेली चरबी वितळवण्यासाठी मलायका सांगतेय एकदम जबरदस्त उपाय….

हिंदी सिनेमाची आयटम गर्ल आणि आपलं तारुण्य टिकवणारी अभिनेत्री मलायका अरोरा ( Malaika Arora ) फिटनेसबद्दल खूप जागरूक आहे, हे सगळ्या जगाला माहित आहे. ती आपल्या सोशल मिडिया अकाउंट वरून सतत व्यायाम (Exercise) करतानाचे व्हिडीओज पोस्ट करते. नुकताच तिने इन्स्टाग्राम वरून एक व्हिडीओ शेअर केला ज्यात तिने एक व्यायामाचा भन्नाट प्रकार सांगितला आहे. हा व्यायाम केल्याने पोट, पाठीचा खालचा भाग, मांड्या इथे असलेली चरबी उतरवण्यासाठी (Fat reduction) खूपच फायद्याचा आहे, असं मलायकाने सांगितलं आहे. 

कसा करायचा हा व्यायाम?

१. या व्हिडीओ मध्ये मलायका व्यायामाचा जो प्रकार दाखवत आहे, तो करतानाच पहिली कृती म्हणजे दोन्ही हाताचे पंजे हे डोक्याच्या मागच्या बाजूला एकमेकांमध्ये अडकवले आहेत. यानंतर एक पाय गुडघ्यात दुमडून बाहेरच्या बाजूने आणून आपल्या कोपरांच्या दिशेने उचलत आहे.

२. दुसरी कृती करताना तिने आपले हात आता समोर छातीसमोर आणून जमिनीला समांतर आडवे ठेवले आहेत. यानंतर ती गुडघे वर उचलून पुन्हा आपल्या हाताच्या पंजाना चिकटवण्याचा प्रयत्न करत आहे. या दोन्ही कृती शक्य तितक्या जलद गतीने करताना दिसत आहे. 

३. चरबी कमी करणे आणि शरीरात जाणाऱ्या अतिरिक्त कॅलरी बर्न करण्यासाठी या व्यायामाचा सराव वरचेवर करायला हवा, असं मलायकाने या व्हिडीओमध्ये सांगितलं.  

काय होतं हा व्यायाम केल्यामुळे?

१. पोट, पाठ, कंबर, मांड्या या भागातील चरबी लवकर कमी होते व इथले स्न्यायू बळकट होतात.

२. ही कृती जलद केल्याने शरीर लवचिक होते. 

३. वजन घेता केल्या जाणाऱ्या कार्डीओसाठीचा उत्तम व्यायाम प्रकार आहे. (Best Cardio exercise)

४. ज्यांना व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, जे जीम मध्ये जाऊन व्यायाम करू इच्छित नाहीत, अशा व्यक्तींना वजन कमी करण्यासाठी हा व्यायाम खूप फायदेशीर ठरू शकतो.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole