पोटाच्या विकारांना दूर ठेवणारे, नक्की करावेत असे हे आयुर्वेदिक उपाय

आपण सकाळी उठलो की निसर्गाच्या हाकेला ओ दिली तरच आपल्या दिवसाची  सुरुवात खूप चांगली होते. पोट नीट साफ होत नसेल खूप त्रासदायक होऊन जातं. परंतु याचा त्रास बहुतांश लोकांना होतो. याचा अर्थ गुदामार्गात अडचणी आहेत (Problems in anal passage). पण याला अवघड जागेचं दुखणं म्हणून याबाबत लाज बाळगतात. म्हणून काही काळानंतर हे दुखणं वाढत जातं. मग काय करावं? गुदामार्गाचे हे विकार कोणते आहेत?  यावरचे उपाय काय आहेत? हे जाणून घ्यायचे आहेत. (Ayurvedic solutions for Problems in anal passage)

एनल फिशर

एनल फिशर म्हणजे गुदद्वाराच्या ठिकाणी होणारी एक छोटी जखम असते. जेव्हा शौचाला कठीण आणि लांब झालं तर गुदद्वाराचं जास्त प्रसरण होऊन जखम होते. यामुळे खूप वेदना होतात. मलावरोध किंवा मुळव्याध हे मागचं कारण आहे. गुदामार्ग किंवा  मोठ्याच्या आतड्याच्या समस्या आहेत असं सांगितलं जातं. यामुळेच बद्धकोष्ठता होते, असं आयुर्वेद सांगतो. आयुर्वेदानुसार बद्धकोष्ठता होण्याची वेगवेगळी कारणे आहेत.

का होते बद्धकोष्ठता?

बद्धकोष्ठता वातविकाराच्या दोषामुळे होऊ शकते. जेव्हा या वात गुणाचा असमतोल होतो, तेव्हा हा त्रास होऊ शकतो. तिखट, मसालेदार, लक्षपूर्वक न खाणे, वारंवार फास्ट फूड खाणे, थंड व कोरडे पदार्थ खाणे, ज्यामध्ये तंतूमय पदार्थ (Fiber) असतात अशा पालेभाज्या, फळभाज्या व फळे न खाणे, रात्री उशीरा खाणे, पाणी पिण्याचं प्रमाण खूप कमी असणे, झोप लवकर न लागणे, यामुळे वात असंतुलित होऊ शकतो. 

गाईचे दूध

लहान मुले असोत किंवा वयोवृद्ध व्यक्ती; प्रत्येकाचा हे गाईचे दूध (Cow milk) पिऊन पोट साफ न होण्याचा त्रास नक्कीच कमी होईल.  गरोदर स्त्रियांसाठीही फायदेशीर आहे. झोपण्यापूर्वी एक पेलाभर दूध कोमट करून प्यायले असता या समस्येवर आराम मिळतो. त्या पेलाभर दुधात जर एक चमचा तूप टाकले तर अजून जास्त फायदा होईल.

गाईचे तूप

गाईच्या तुपाच्या सेवनाने पचनक्रिया सुलभ होते. गाईचे तूप (Cow ghee) हे पौष्टिक असते. शरीरात उपयुक्त चरबी (Good Cholesterol)ची साठवणूक यामुळे होते. गाईचे तूप खाल्ल्याने अ, ड, ई आणि के ही महत्वाची चरबी विरघळण्यास मदत करणारी जीवनसत्वे शरीराकडून शोषून घेतली जातात.  

काळे मनुके

तंतुमय पदार्थांचा एक उत्तम स्त्रोत म्हणून काळा मनुका (black raisins) खाल्ला जातो. तरीही हे मनुके सुके खाऊ नयेत कारण पुन्हा वाताचा समतोल बिघडतो. जठरावरही याचा परिणाम होतो. उत्तम पचन होण्यासाठी आपण हे मनुके भिजवून खायला हवेत. 

आवळा

आवळा खाल्ल्याने शौचाला सुलभ होते. तसेच सकाळी आवळा रस (Amla Juice) प्यायल्याने किंवा आवळा खाल्ला असता रोगप्रतिकारक शक्ती (Immunity System) सुधारते. आरोग्याच्या तक्रारी खूप कमी होतात. सर्व वयोगटासाठी आवळा फायदेशीर आहे. 

मेथीच्या बिया

मेथीचे दाणे खाल्ल्याने पचनाच्या समस्यांचे निवारण होते. मेथीचे दाणे (fenugreek seed) केवळ वात आणि कफ प्रकोप असणाऱ्या व्यक्तींनी खावेत, त्यांच्याकरता हे खूप फायदेशीर आहेत. रात्री मोजकेच दाणे पाण्यात भिजवून ते पाणी बियांसह प्यायला हवं. रात्री चमचाभर मेथीची पूड ग्लासभर पाण्यात टाकून पिता येऊ शकते. 


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole