घरामध्ये या ६ गोष्टी दिसणं खूप शुभ मानलं जातं.

लक्ष्मी कोणाला प्रिय नाही, आपल्यापैकी प्रत्येक जण तिची आराधना करतो. त्यासाठी आपण सर्वच जण प्रामाणिकपणे कष्ट करतो, त्यातून आपल्याला पैसा अर्थात लक्ष्मीची प्राप्ती होते. ज्योतिष शास्त्राच्या मते, घरात लक्ष्मी येणार असेल तर काही संकेत मिळतात. हे संकेत धनवर्षाव होण्याचे असतात, असे मानले जाते. पूर्वापार आपल्याकडे काही घटना, गोष्टी घडल्या की त्या कशाचे तरी संकेत असतात असे म्हटले जातं. जसं घरावर कावळा बसून ओरडला की घरात पाहुणे येणार असं मानलं जातं. तर रस्त्याने मांजर आडवं गेलं तर अशुभ घडणार असं म्हणतात. पण या सर्व गोष्टी मानल्या जातात त्याला काही वैज्ञानिक आधार आहे का याचा उलगडा झालेला नाही. त्याच प्रमाणे लक्ष्मीच्या म्हणजे धनाच्या आगमनाचे काही संकेत किंवा चिन्हं दिसतात, अशी मान्यता आहे. 

काळ्या मुंग्या-

 एरवी मुंग्या म्हटलं की आपण वैतागतो मात्र अचानक भरपूर प्रमाणात काळ्या मुंग्या आल्या तर हे लक्षण चांगले मानले जाते. या काळ्या मुंग्या खाताना दिसल्या तर हा लक्ष्मीच्या आगमनाचा शुभ संकेत आहे असे मानले जाते. 

घुबड- 

लक्ष्मीचे वाहन उल्लू म्हणजेच घुबड. त्यामुळे घुबडाचे दर्शन झाले तर भाग्यवान असता. कारण सहसा घुबडाचे दर्शन कोणाला होत नाही, ते दर्शन झाले तर ही गोष्ट सामान्य नाही. घुबड दिसले तर धनवर्षाव होणार असे मानले जाते. 

उजव्या तळहाताला खाज-

हा अनुभव आपल्यापैकी बहुतेकांनी घेतला असेल. खरंतर खाज सुटणे ही काही वेगळी  गोष्ट नाही. पण तळहाताला खाज सुटणे ही देखील नेहमी घडणारी गोष्ट नाही. त्यामुळे उजव्या हाताच्या तळव्याला खाज येत असेल तर लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न् झाली असे म्हणायला हरकत नाही. उजव्या तळहाताला खाज येणे हे लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत आहेत. 

घरात घरटे- 

पक्षी सहसा झाडावर घरटी बांधतात पण घराच्या कोपऱ्यात पक्षांनी घर बांधणे ही क्वचितच घडणारी घटना आहे. जर तुमच्या घरात पक्ष्यांनी घरटं बांधून त्यात अंडी घातली असलीत तर लवकरच तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता असते. एखाद्या ठिकाणाहून रखडलेले पैस परत मिळण्याचे हे संकेत आहेत. 

कोकिळेचा आवाज-

 सकाळी उठल्याबरोबर जर तुम्हाला कोकिळेचा आवाज ऐकू आला तर तुम्हाला धनलाभ होण्याचे हे संकेत आहे, असे समजून जा. 

झाडू मारताना दिसणे- 

आपण घरातून बाहेर पडत असताना आपल्याला कोणी झाडू मारताना दिसले तर ते शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार झाडू हा शुभ असतो त्यामुळे झाडू ठेवताना योग्य दिशेने ठेवावा. तसेच दिवेलागणीच्या वेळी केर काढू नये.त्यामुळे झाडू मारताना कोणी दिसले तर वैतागू नका. लाभ होणार आहे.

तर अशी सहा शुभचिन्हे दिसल्यावर आनंदी व्हा, सकारात्मक व्हा आणि कारण लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार, असा ज्योतिषशास्त्राचा संकेत आहे. म्हणून येणाऱ्या लक्ष्मीचे स्वागत करा.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole