9 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

सिरमचा गेट्स सोबत करार

  • कोरोना प्रतिबंध लसनिर्मितीसाठी पुण्यातल्या संस्था सिरम इस्टिट्यूटने गेट्स फौंडेशन सोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत 2021 पर्यन्त 100 दशलक्ष डोस तयार करून तळागाळातील लोकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे.
  • या करारामुळे 100 दशलक्ष डोस तयार करण्याच्या उद्दिष्टला वेग आला असून लवकरच सगळ्या चाचण्यांची पूर्तता करण्यात येणार आहे.

टिक टॉक आणि वुईचाट वर अमेरिकेत बंदी

  • टिक टॉक आणि वुईचाट या चीन संबंधित मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घालणाऱ्या आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. येत्या 45 दिवसात बंदी हुकूम लागू होणार आहे.

बैरुत मध्ये स्फोट.

  • नागरी युद्ध, इस्राईल सोबतचे ताणलेले संबंध आणि दहशतवादी हल्ले सोसनाऱ्या लेबनॉनची राजधानी बैरुतला जोरदार स्फोटाने हादरा बसला. हा स्फोट अमोनियम नायट्रेटचा साठा पेटल्याने झाला आहे. यात 100 पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले तर 4 हजारांहून अधिक लोक जखमी झाले.
  • 2014 मध्ये एका मालवाहतूक जहाजमधून जप्त केल्यानंतर 2700 टनहुन अधिक अमोनियम नायट्रेटमुळे हा स्फोट झाल्याचे समजत आहे.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक करून सोडावा


Join us on Telegram and Get all Updates

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole