मोबाईलवर येत आहे 5G नेटवर्क, तुम्हालाही हवं असेल तर हा लेख वाचा…

नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातल्या 5G सेवेचा श्री गणेशा केला आहे. देशवासीय आता आपल्या शहरात ही सेवा कधी सुरु होईल, याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आपल्याला हे माहित आहे का की आताही मोबाईलमध्ये 5G नेटवर्क येत आहे.

तुमच्याही मोबाईलमध्ये 5G नेटवर्क येतं आहे का?

जर तुमच्याकडे एअरटेलचं सीम असेल आणि तुम्ही 5G स्मार्ट फोन वापरत असाल तर आपण 5G चा लाभ घेऊ शकता. सध्या फोनमध्ये 4G किंवा VoLTE नेटवर्क येत असेल तर आता तिथे तुम्हाला 5G दिसू लागेल.

एअरटेल कडून 5G सेवेस प्रारंभ

एअरटेल कंपनीतर्फे 5G सेवा उपलब्ध करू दिली जात आहे. दिल्ली, कोलकाता, सिलिगुडी, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई या शहरांमध्ये 5G ची सुरुवात झालेली आहे. या शहरात पहिल्या टप्प्यात 5G सुरू झाले. जर तुम्हाला 5G दिसत नसेल तर मोबाईल मध्ये त्याप्रमाणे सेटिंग बदलून घ्यायला हवेत.

अशी बदला सेटिंग

ज्या शहरांत ही 5G सेवा सुरू झाली आहे, त्या शहरात जर तुम्ही असाल तर तुम्ही या 5G सेवेचा लाभ सहज मिळवू शकता. पण जर हा लाभ मिळत नसेल तर फोनच्या सेटिंग्ज काही बदल करणं गरजेचं आहे. सेटिंग्ज बदलण्यासाठी काही पायऱ्या वापराव्यात. फोन सेटिंग्ज या पर्यायावर सगळ्यात आधी क्लिक करावं. येथे तुम्हाला Connection या पर्यायावर क्लिक करावे लागेल. काही फोनमध्ये, हा पर्याय सिम कार्ड आणि मोबाइल नेटवर्क्सच्या नावाखाली देखील येतो. या सेटिंग्ज मध्ये गेल्यानंतर कनेक्शन हा पर्याय निवडावा. शक्यतो हा पर्याय बहुतेक फोन्समध्ये हा पर्याय मोबाईल नेटवर्क व सीम कार्ड याखाली आढळून येतो.आता दोन सीमकार्ड पैकी जे सीम कार्ड आता नवीन नेटवर्क देत आहे, ते कोणते आहे, ते पाहून त्यावर क्लिक करावं. यानंतर Network Type अथवा Preferred Network Type चा पर्याय निवडायला हवा. यांत तुम्हाला जे हवं आहे ते 5G नेटवर्क आहे, त्यातील ऑटो मोड हा पर्याय निवडावा. हा मोड निवडला आणि क्लिक केलं की आपल्याला 5G मिळालं, असं नाही. पण आधीच्या 4G नेटवर्क वरून 5G नेटवर्कवर मारलेली ही उडी आहे, असं म्हणायला हरकत नाही.

जर 5G आढळला नाही तर……

जर वरील पायऱ्यानुसार जाऊन काही मिळालं नाह आणि 5G चा सिग्नल आला नसेल तर आपल्या स्मार्टफोनच अपडेशन करायला हवं.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole