हे नियम पाळा आणि उताऱ्यात पैकीच्या पैकी मार्क मिळावा.

राज्यसेवा पूर्व परीक्षेचा दुसरा पेपर आपण पाहिल्यास त्यांच्या मध्ये ढोबळमनाने Comprehension, Decision Making आणि Maths / Reasoning चे प्रश्न असतात आणि या सगळ्याला आपण CSAT असं जबरदस्त नाव देतो. बरेच विद्यार्थी MPSC CSAT Syllabus & Pattern न पाहताच अवघड असल्याचे सगळ्यांना सांगत बसतात.

  • Comprehension – 125
  • Decision Making – 12.5
  • Maths / Reasoning – 62.5

आता या विभागाचे मार्क वर दिल्याप्रमाणे पाहिल्यास Comprehension आणि Decision Making चे प्रश्न अगदी सोपे असतात म्हणजे Maths / Reasoning अवघड आहे म्हणून सगळं पेपर अवघड होत नाही. यावर Dnyandeep Academy चे Mahesh Shinde Sir यांनी एक छान मत मांडले आहे तो विडिओ आपण पाहिल्यास नक्कीच फायदा होईल. (विडिओ साठी इथे क्लीक करा)

आज आपण पाहणार आहोत MPSC CSAT पेपर मध्ये उत्तरे सोडवण्याचे 5 नियम ज्यामुळे तुम्हाला चुका टाळून जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील. आणि तुमचे Mission MPSC फत्ते करण्यास मदत होईल.

उतारा आधी की प्रश्न आधी

MPSC CSAT च्या पेपर मध्ये उत्तरे देण्यामागचा उद्देश हा आहे कि तुम्हाला Comprehension किती होते म्हणजे यासाठी तुम्हाला उत्तर पूर्णपणे समजणे गरजेचे आहे. आता प्रश्न आधी वाचल्याने, उतारा वाचताना फक्त त्या भागावरच लक्ष केंद्रित होते आणि इतर भाग अजिबात समझत नाही त्यामुळे उत्तर पूर्ण समझत नाही आणि चुका होतात. त्यामुळे अनेकांच्या अनुभवांनुसार उतारा आधी वाचून मग प्रश्न सोडवणे जास्त फायद्याचे आहे.

नियम 1 – उत्तर अगदी शांतपणे वाचून घ्या. उत्तर वेगात वाचू नका. मोठी आणि अवघड वाक्ये नीट समझून घ्या. उतारा आधी वाचून मग प्रश्न सोडवायला घ्या.

आपण नीट उताऱ्यावरील सूचना नीट वाचल्यावर लक्षात येईल कि तिथे लिहिलेले असते कि खालील प्रश्न दिलेल्या उताऱ्यावर आधारित सोडावा. पण आपण अभ्यास केलेला एखादा विषयाचा उतारा आल्यावर आपण नकळत स्वतःचे ज्ञान लावतो आणि मार्क गमवून बसतो. यालाच आपण मग नंतर चुकून झालेली चूक म्हणत बसतो त्यामुळे उतारा सोडवताना कधीही स्वतःचे ज्ञान लावू नका.

नियम 2 – उत्तरे सोडवत असताना कायम लक्षात घ्या कि उताऱ्यांची उत्तरे फक्त आणि फक्त त्यावरच आधारित असावीत. हा नियम लक्षात राहत नसल्यास प्रश्नपत्रिकेतील सूचना कायम वाचण्याची सवय लावा.

उतारा वाचताना आणि त्यावरील प्रश्न सोडवताना काही Keywords किंवा घातकी शब्द येतात ज्यामुळे पूर्ण अर्थ बदलून जातो आणि तुमचे उत्तर पूर्णपणे चुकते. त्यामुळे अश्या घातकी शब्दावर आपली चांगली पकड पाहिजे जेणेकरून तुम्हाला एन परीक्षेत दगाफटका होणार नाही.

यामध्ये नेहमी, कायम, फक्त, केवळ, सर्व, काही, यामुळेच अश्या शब्दांचा समावेश होतो. या सोबतच ज्या शब्दात च चा समावेश आहे त्याचाही अर्थ बदलत असतो.

नियम 3 – उताऱ्यातील Keywords किंवा घातकी शब्द शोधा. विधानातील जसेच्या तसे शब्द नसतील तर त्याच्या समानार्थी शब्द शोधावेत आणि मगच उत्तर द्यावे.

उतारे मधून जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी तुमची Accuracy असणे महत्वाची आहे आणि ती ते फक्त प्रॅक्टिस करून. त्यामुळे परीक्षेच्या आधी भरपूर उतारे सोडावा जेणेकरून तुम्हाला स्मार्ट पद्धती कळतील.

Elimination Method ही एक महत्वाची स्मार्ट पद्धती आहे. अनेकदा मोठे मोठे प्रश्न असल्यावर त्यातील सर्व पर्याय वाचण्याची गरज नसते कारण Elimination Method वापरून उत्तर अगदी सहज सापडते.

नियम 4 – जास्तीत जास्त उताऱ्यांची प्रॅक्टिस करा आणि Elimination Method वापरून तुमची Accuracy वाढवा.

ज्यांनी कधीही CSAT पेपरचा नीट अभ्यास केला नाही असे अनेक लोक इतरांना टिप्स देत असतात. पहिली म्हणजे CSAT अवघड असते आणि त्यानंतर मोठे उतारे अवघड असतात आणि लहान सोपे. मित्रानो उतारे लहान आणि मोठ्या वरून सोपे अवघड ठरत नाहीत तर ते तुमच्या आवडी निवडी वर ठरतात.

जो विषय ज्या भाषेत वाचला आहे त्या विषयाचे उतारे सुद्धा त्याच भाषेत सोडावा. यामुळे साधारणपणे विज्ञान आणि भूगोलाचे उतारे सोपे जातील आणि तुमची अचूकता वाढेल.

नियम 5 – सर्वच्या सर्व उतारे वाचावेत. Science आणि Philosophy चे उतारे समजण्यास अवघड असले तरी प्रश्न फार सोपे असतात. वेळखाऊ प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका त्याचप्रमाणे पूर्ण उत्तर स्किप करू नका.

MPSC Pre CSAT च्या पेपर मध्ये भरभरून मार्क मिळवण्यासाठी नियम फक्त वाचून उपयोग नाही तर याची जास्तीतजास्त प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.