चालू घडामोडी – 31 मे 2021

तरुण लेखकांसाठी केंद्राचा विशेष प्रकल्प

  • ३० वर्षांच्या आतील युवा लेखकांना मेंटर, प्रोत्साहनकर्ते किंवा मार्गदर्शक उपलब्ध करून देऊन नवीन पिढीत दर्जेदार लेखक घडवण्यासाठी एक महत्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने आखली आहे.
  • ही ‘युवा’ योजना सुरू करण्याचा उद्देश हा आहे की बहुपेडी प्रतिभा असलेले तरुण लिहिते व्हावेत.
  • भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. युवा लेखकांच्या लेखनगुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्याकडून पुस्तके लिहून घेण्यासाठी ही योजना ३० मे पासून सुरू केली आहे.
  • १५ ऑगस्ट २०२१ या दिवशी केंद्र सरकारच्या निकषांवर उतरणारी दर्जेदार युवा लेखकांची पहिली फळी समोर आणण्याचे केंद्राने ठरवले आहे.
  • ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२२ ला ७५ युवा लेखकांची ७५ पुस्तके प्रकाशित करण्यात येतील. विविध भारतीय भाषांमधील जेष्ठ श्रेष्ठ आणि नामवंत लेखकांनी या युवा लेखकांना मार्गदर्शन तसेच प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून स्वातंत्र्यलढयाशी निगडीत विविध ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसेनानींच्या  जीवनावरील किमान ७५ पुस्तके लिहून घ्यायची आहेत.
  • या लेखकांच्या निवडीसाठी १ जून रोजी देशपातळीवर लेखन स्पर्धा घेण्यात येणार आहे.

कोरोनामुळे शिक्षण थांबले, बालमजूरी वाढली.

  • कोरोनाचा फटका अल्पवयीन मुलांनाही बसला आहे.  कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा रोजगार बुडाला व शाळा बंद असल्याने अनेकजण बालमजूरीकडे ओढले गेले आहेत.
  • गेल्या वर्षाभरात वीतभट्टी, ऊस तोडणी, घरकाम करताना शालेय शिक्षण घेणारी मुले दिसू लागली आहेत. मात्र कामगार विभागाकडे केवळ ५५ बालकामगारांची नोंद आहे.
  • आश्रमशाळा, वसतीगृहात राहून शिक्षण घेणारी मुले सध्या घरीच आहेत. दुर्गम भागात आणि ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल व इंटरनेट सुविधेअभावी मुले शिक्षणापासून बाजूला गेली आहेत. कुटुंबाला मदत करण्यासाठी त्यांना मोलमजूरी करावे लागत आहे.
  • सरकारच्या बालकामगारांच्या व्याख्येनुसार १४ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले व १४ ते १८ या वयोगटातली मुले जी धोकादायक उद्योग व्यवसायात काम करतात ती बालकामगार समजली जातात.
  • सध्या जितके बालकामगार सापडले आहेत त्यापेक्षा कमीच गुन्हे नोंदवले गेले आहेत.

काळ्या बुरशीवरील उपचारासाठीचं औषध आयआयटी हैदराबादमध्ये तयार.

  • आयआयटी हैदराबादच्या संशोधकांनी काळ्या बुरशीच्या म्हणजे म्युकरमायकोसिस उपचारासाठी उपयुक्त असणारे तोंडावाटे घेण्याचे औषध तयार केले आहे.
  • दोन वर्षाच्या सततच्या अभ्यासानंतर आता संशोधकांना विश्वास आला आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी याचे तंत्रज्ञान योग्य औषध निर्माण कंपनीला हस्तांतरीत करण्यात येईल.
  • रुग्णांसाठीचा हा सहजसोपा औषधोपचार आहे. तर ६० मिग्रॅ औषधांची किंमत जवळपास २०० ₹ असेल.
  • सध्या या काळ्या व अन्य सर्व प्रकारच्या बुरशीच्या संक्रमणावर काला आजार म्हणजे व्हिसेरल लेश्मानियासीस ची उपचार पद्धती वापरली जात आहे.
  • हे बनवलेले औषध बौद्धिक हक्क संपदेपासून मुक्त असेल म्हणजे याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ शकेल व हे सर्वांना सहज उपलब्ध होणारे व परवडणारे असेल.

कोविड १९ मुळे अनाथ झालेल्या प्रत्येक मुलासाठी १० लाख ₹ ची मदत

  • केंद्र सरकारने आता कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी ही खास योजना आणली आहे, तिचं नाव “पीएम केअर फॉर चिल्ड्रन” असं आहे.
  • या योजनेद्वारे जोवर ही मुले १८ वर्षाची होत नाहीत तोवर हा प्रत्येक मुलासाठी 10 लाख ₹ निधीस्वरूपात दिले जाणार आहेत.
  • महिला व बाल विकास मंत्रालयाने या कोविड १९ मुले अनाथ झालेली अशी ५७७ मुले-मुली आहेत अशी माहिती दिली.
  • ही मुले १८ वर्षाची होतील तेंव्हा या निधीतून दरमहा शिष्यवृत्ती मिळवू शकतील ज्याद्वारे त्यांना वैयक्तिक गरजांसाठी ते पैसे वापरता यतील.
  • जेंव्हा ही मुले २३ वर्षाची होतील तेंव्हा ते निधिचे सर्व १० लाख ₹ त्यांना दिले जाणार आहेत.
  • सरकार अशा मुलांच्या शालेय शिक्षणाची पण सोय करणार आहे. जवळच्या केंद्रीय विद्यालयामध्ये किंवा जवळच्या खाजगी शाळांमध्ये त्यांना प्रवेश घेण्यास मदत करणार आहे.
  • जर का मुलगा/ मुलगी यांना खाजगी शाळेत घातलं तर त्याची फी सुद्धा पीएम-केयर्स फंडातून भरली जाईल. पीएम-केयर्स त्यांच्या गणवेश, वह्या-पुस्तके यांची जबाबदारी घेणार आहे. हे सर्व सर्व शिक्षणाधिकार कायदा २००९ च्या तरतुदींनुसार असणार आहे.
  • ११ ते १८ वयोगटाच्या मुलांना निवासी शाळांमध्ये शिक्षण घेण्याची सोय करण्यात येईल. उदा. सैनिक स्कूल, नवोदय विद्यालय.
  • या मुलांच्या उच्च शिक्षणासाठीची सोय ही केली गेली आहे की यांना त्यांच्या भविष्यातल्या फी इतकी शिष्यवृत्ती मिळेल, किंवा त्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. ज्याचं व्याज ही पीएम-केयर्स मधूनच भरलं जाईल.
  • या मुलांची आयुष्यमान भारत योजनेत नाव नोंदणी केली जाईल ज्यात ५ लाख ₹ चा विमा उपलब्ध आहे. याचा हफ्ता सुद्धा पीएम-केअर फंडातून देण्यात येईल.
  • ईएसआयसी कडून मिळणारी पेन्शन योजना याचा कालावधी वाढवला आहे आता ही योजना २४ मार्च २०२२ पर्यन्त लागू आहे.
  • कर्मचारी ठेव निगडीत विमा योजनेचे (EDLI) फायदे जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमार्फत आहेत ते लवकरच मिळतील.

आयआयटी मंडीच्या संशोधकांचे सार्स सीओव्ही २ च्या प्रोटीन संरचनेवर संशोधन

  • हिमाचल प्रदेशमधील आयआयटी मंडी च्या संशोधकांनी सार्स सीओव्ही २ च्या विषाणूमधील मुख्य प्रथिन (Protein) ची संरचना प्रदर्शित केली आहे.
  • आता याद्वारे याची कार्यप्रणाली, फैलाव होण्यातील मुख्य भूमिका, रोगाची गांभीर्यता, या विषाणूविरोधी औषध तयार करण्यास या संशोधनाची मदत होणार आहे.
  • एखाद्या विषाणूला निष्प्रभ करण्याचा एकच मार्ग आहे, त्याच्या प्रथिनसंरचनेचा अभ्यास करून त्यावर हल्ला चढवणे. कोविड १९ च्या या संशोधनासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.
  • या कोरोना- सार्स सीओव्ही २ विषाणूमध्ये १६ अरचनीय प्रथिने आहेत (Non-structural proteins: NSP1 – NSP 16) हेच रोगजनकपणा (Pathogenicity) करण्यास कारणीभूत असतात.
  • यातील एनएसपी१ हे यजमान म्हणजेच मानवी पेशीतील प्रथिने त्यांचे क्रम विस्कळीत करते. व त पेशीचे रोगप्रतिकार करण्याचे कार्य करण्याला दाबून टाकते. म्हणूनच याला यजमानाचे कार्य बंद पाडणारा घटक म्हणतात.
  • या शास्त्रज्ञांनी या एनएसपी१ प्रथिनाच्या संरचनेचा अभ्यास विविध रासायनिक वातावरणात केला आहे, आणि नंतर ही संरचना जगापुढे मांडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole