31 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

दहावीचा निकाल जाहीर

  • राज्य महामंडळाच्या दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला तर यंदा यात 18 टक्के वाढ झाल्याचं पाहायला मिळाले.

यंदाच्या दहावीच्या निकालाबाबत काही ठळक बाबी

1. पहिल्यांदाच उच्चांकी 95% निकाल, गेल्या वर्षीच्या तुलनेत 18 टक्क्यांची वाढ.
2. 100 टक्के पडलेल्या 242 पैकी 151 विद्यार्थी लातूरचे. मागील वर्षी फक्त 20 विद्यार्थ्यांना 100 टक्के.
3. समाजशास्त्राचा निकाल 100 टक्के. राज्यात एकही विद्यार्थी नापास नाही.
4. 90% पेक्षा अधिक मार्क मिळवणारे 83 हजार विद्यार्थी, मागील वर्षी 28 हजार होते.


राष्ट्रीय शिक्षण धोरण

  • नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला 34 वर्षानंतर केंद्रीय मंत्रीमंडळाने परवानगी दिली. यानुसार दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे महत्व कमी करण्यात आले आहे. आता सहावीनंतर व्यवसायिक शिक्षण दिले जाईल.
  • नवे सूत्र – शालेय शिक्षणाची रचना आता 10+2 ऐवजी 5+3+4+4 अशी झाली आहे.
  • एकच नियामक मंडळ – सध्या उच्च शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमासाठी वेगवेगळ्या नियामक संस्था आहेत त्या ऐवजी अमेरिकेच्या धर्तीवर एकच नियामक मंडळ असेल.
  • अंतरशाखीय शिक्षण – दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे महत्व कमी. त्या परीक्षा दैनंदिन ज्ञानावर आधारित घेतल्या जाणार आहेत.
  • M phill ऐवजी थेट PhD – उच्चशिक्षणात लवचिकता आणण्याच्या दृष्टीने विद्यापीठामध्ये अंतरशाखीय विषय शिकत येतील. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना M phill करण्याची गरज नाही.

मारुती सुझिकीवर 17 वर्षात प्रथमच तिमाही तोटा.

  • भारतीय वाहन निर्मिती मधील अव्वल आणि अर्ध्यापेक्षा जास्त हिस्सा राखणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीला 17 वर्षात प्रथमच तिमाही तोटा झाला आहे.
  • कंपनीची वार्षिक वाहन निर्मितीची क्षमता 15.50 लाख आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीला 268.38 कोटी रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक करून सोडावा


Join us on Telegram and Get all Updates

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole