30 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

राष्ट्रकुल संघटनेची स्थापना.

  • 2020-21 च्या हंगामासाठी भारतीय ऑलम्पिक संघटनेने (IOA) 11 सदस्य असणारी भारतीय राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदी नारिंदर बात्रा यांची निवड करण्यात आली आहे.
  • 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय खेळाडूंशी संबंधित प्रत्येक गोष्टीवर ही संघटना कार्यरत असेल.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

  • लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टमार्फ़त देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक याना जाहीर झाला आहे.
  • अनेक अभिनव कल्पना आणि प्रयोगांसाठी सोनम वांगचूक प्रसिद्ध आहेत. त्यांना मानाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.

All About Tiger Estimation 2018

  • जगातील एकूण वाघांच्या संख्येपैकी 70 टक्के वाघ भारतात असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. All About Tiger Estimation 2018 नावाचा अहवाल त्यांनी यावेळी सादर केला.

अहवालानुसार
1. भारतातील वाघपैकी सर्वाधिक 231 वाघ कॉर्बेट अभरण्यात आहेत.
2. मिझोराम मधील डम्पा अभयारण्य, पश्चिम बंगाल मधील बक्स अभयारण्य आणि झारखंड मधील पलामाऊ अभयारण्यत एकही वाघ उरलेला नाही.
3. राज्यनिहाय मध्य प्रदेश मध्ये सर्वाधिक 526 वाघ आहेत.


आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक करून सोडावा


Join us on Telegram and Get all Updates

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole