चालू घडामोडी – 30 एप्रिल 2021

राज्यातील सर्वांना लस मोफत

  • १८ ते ४४ वयोगटाच्या व्यक्तींना कोविड लास मोफत देण्याचा राज्यसरकारचा निर्णय.
  • लसीकरणासाठी अँपवर नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.

भारतफ्रान्स युद्ध सराव : वरूण २०२१

  • भारत व फ्रान्स दरम्यान नौदलाचा संयुक्त युद्धसराव ‘वरुण’ पार पाडला. त्याचे हे १९ वे वर्ष होते.२५ ते २७ एप्रिल दरम्यान अरबी समुद्रात झालेल्या या अभ्यासात अत्यंत उच्च दर्जाच्या नौदल कसरती करण्यात आल्या.
  • अत्याधुनिक हवेतील संरक्षण मोहिमा, पाणबुडी रोधी कारवाया, निश्चित व फिरते ऑपरेशन्स ज्यात हेलिकॉप्टर्सची क्रॉस लँडिंग इ. प्रात्यक्षिके करण्यात आली. त्याचबरोबर जमिनीवरील व हवेतील शस्त्रास्त्र मारा व इतर सागरी सुरक्षा प्रत्यक्षिकांचा या वेळी सराव करण्यात आला.
  • भारताची क्षेपणास्त्र सज्ज युद्धनौका ‘तर्कश’ व फ्रान्स ची ‘स्ट्राईक ग्रुप’ यांच्यातला युद्धसराव २८ एप्रिल ते १ मे दरम्यान होणार आहे.

तेजस मारक क्षमता

  • स्वदेशी बनावटीचे वजनाला हलके ‘तेजस विमान’ त्याची मारक आणखीन वाढणार आहे.
  • तेजसमध्ये हवेतून हवेत मारा करणाऱ्या ‘पायथॉन’ हा पाचव्या पिढीतील क्षेपणास्त्राचा समावेश केला आहे.
  • याच्या चाचण्या यशस्वी झालाय आहेत, त्याचबरोबर तेजस हे दृष्टीच्या पलीकडे असणाऱ्या लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे.
  • डर्बी व पायथॉन या दोन्ही क्षेपणास्त्रांनी आपलं
  • आपआपले लक्ष्य व्यवस्थित अचूकपणे भेदले.
  • हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या भारतीय कंपनीनेच त्याची निर्मिती केली आहे.

दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्र दुरुस्ती कायदा

  • केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्र दुरुस्ती कायदा अधिसूचित केल्यामुळे दिल्ली आता नायब राज्यपालांच्या अधिकारक्षेत्रात आली आहे.
  • दिल्ली राज्याच्या स्वतंत्र निर्णय घेण्याच्या अधिकारांना कात्री लागली आहे. सध्या अनिल बैजल हे दिल्लीचे नायब राज्यपाल आहेत.
  • वास्तविक लोकनियुक्त सरकारलाच प्रशासकीय निर्णय घेण्याचा अधिकार व त्यानुसार नायब राज्यपालांच्या अधिकारकक्षा स्पष्ट करणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये दिला, केंद्र सरकारने त्याला बगल देत हा कायदा पारित केला आहे.
  • दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नाही, म्हणून सार्वजनिक व्यवस्था, जमीन व पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात तर आरोग्य, शिक्षण, शेती, वन व वाहतूक यांकडे राज्यसरकार लक्ष देते.
  • आता दिल्ली सरकार म्हणजे नायब राज्यपाल ही या कायद्यातील व्याख्या आता प्रत्यक्षात आली आहे.

२०२१ चा जी. डी. बिर्ला पुरस्कार प्रा. सुमन चक्रवर्ती यांना

  • ३० वा जी. डी. बिर्ला पुरस्कार वैज्ञानिक संशोधनासाठी प्रा. सुमन चक्रवर्ती यांना प्रदान.
  • वैज्ञानिक अभियांत्रिकी आणि सुयोग्य आरोग्य सेवेसाठी तंत्रज्ञान विकसित करण्याबद्दल त्यांची निवड करण्यात आली.
  • चक्रवर्ती हे भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आयआयटी खरगपूर इथं प्राध्यापक आहेत.

माजी खासदार एकनाथराव गायकवाड यांचे निधन

  • वय ८१, काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मंत्री व माजी खासदार.
  • धारावी मतदारसंघ, मुंबई येथून तीन वेळा विधानसभेवर आमदार (१९८५, १९९० व १९९९).
  • १९९३९५ दरम्यान पहिल्यांदा राज्यमंत्री, तर १९९९ ला दुसऱ्यांदा राज्यमंत्री.
  • २००४ लोकसभा निवडणुकीत मनोहर जोशींचा पराभव केल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर चर्चेत.

आशियाई कब्बडी महासंघाचे अध्यक्ष जनार्दनसिंग गेहलोत यांचे निधन

  • वय ७० वर्षे, आंतरराष्ट्रीय व आशियाई कब्बडी महासंघाचे अध्यक्ष,भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष.
  • भारतीय कबड्डी महासंघाचे शरद पवार अध्यक्ष असताना गेहलोत उपाध्यक्ष होते, १९८४८५ मध्ये पवार यांनी क्रीडा मार्गदर्शक तत्वांमुळे अध्यक्षपद सोडल्यामुळे ते अध्यक्ष झाले.
  • हे अध्यक्षपद त्यांनी २८ वर्षे भूषवले.

DOWNLOADMPSC Question Papers [ALL]


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole