चालू घडामोडी – 29 मे 2021

महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन मागणीपेक्षा तिप्पट

  • यंदाच्या गाळप हंगामात उसाचे विक्रमी १०१२ लाख टन गाळप झाले आहे. १०६.३० लाख टन साखर उत्पादित झाली आहे.
  • दरवर्षी महाराष्ट्राला ३५ लाख साखरेची आवश्यकता असते. यंदा तिप्पट साखर तयार झाली असून बाजारात साखर मुबलक प्रमाणात असेल.
  • यंदा ९३% ऊसाची रास्त किफायतशीर रक्कम (एफआरपी) वसूल अद्याप २९ कारखान्यांकडे अजून १४०० कोटी थकीत आहे.
  • राज्यातील २५ कारखान्यांनी प्राणवायू निर्मितीची तयारी दर्शवली आहे. धाराशिव साखर कारखान्यात प्राणवायू निर्मिती सुरू झाली आहे. बाकी कारखान्यांनी तैवानमधून यंत्रसामग्री मागवली आहे.
  • ११.४२ लाख हेक्टर क्षेत्रफळावर ऊसाची लागवड केली गेली आहे.
  • कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे लक्ष दिल्यामुळे साखरेचा गाळप उतारा १०.५०% इतका आहे.
  • पुढील वर्षी कारखान्यांकडून ३०० कोटी ली. इथेनॉल उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आहे.
  • पुढील १२ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उत्पादन होण्याचा अंदाज आहे. डाळींब, द्राक्षे, सोयाबीन ही पिके अडचणीत आल्यामुळे त्याच्यातून खात्रीशीर उत्पन्न मिळतं अशा ऊसाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असणार आहे.

भारतीय विद्यापीठांचा जगभरात डंका

  • आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय शिक्षण संस्थांनी आपला ठसा उमटवला आहे.
  • ‘सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’ जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२१/२२ जारी केली आहे.
  • यामध्ये दर्जाच्या बाबतीतही भारतीय विद्यापीठे आघाडीवर आहेत.
  • जगभरातील २००० संस्थांमध्ये ६८ भारतीय संस्था आहेत.
  • या क्रमवारीमध्ये आयआयएम् अहमदाबाद ४१५व्या तर ४५९व्या स्थानी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था आहे.
  • यामध्ये जेएनयू, बनारस हिंदू विद्यापीठ, आयआयटी रुडकी, आयआयटी गुवाहाटी, एम्स नवी दिल्ली, जादवपूर व कोलकाता विद्यापीठ आणि वेल्लोर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थांचा संवेश आहे.

प्रा. सी.एन.आर.राव यांना एनी आंतराष्ट्रीय पुरस्कार

  • आंतरराष्ट्रीय एनी पुरस्कार २०२० हा भारतरत्न प्रा. सी.एन.आर.राव यांना मिळाला आहे.
  • त्यांनी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांबद्दल आणि ऊर्जा साठवणुकीबद्दल केलेल्या संशोधनाकरता हा पुरस्कार त्यांना मिळाला.
  • या पुरस्काराला ऊर्जा संशोधन क्षेत्रातील नोबेल परितोषिकाचा दर्जा आहे.
  • हायड्रोजन ऊर्जा हा ऊर्जेचा एकमेव व मानव जातीच्या फायद्याचा स्रोत आहे. यांवर मागील काही वर्षे प्रा.सी.एन.आर.राव हे संशोधन करत आहेत.
  • हायड्रोजनची साठवणूक, त्याचे प्रकाशरासायनिक आणि विद्युतरासायानिक उत्पादन, सौर उत्पादन, हे त्यांच्या संशोधनाचे मुख्य विषय होते.
  • धातूची ऑक्साईड, कार्बनच्या नॅनोट्यूबस, ग्रॅफीन च्या द्विमितीय यंत्रणा, बोरॉननायट्रोजनकार्बन हायब्रीड मटेरिअल्स आणि ऊर्जा अनुप्रयोगासाठी मॉलिब्डेनम सल्फाईडची निर्मिती, हरितहायड्रोजनचे उत्पादन इ. गोष्टींवर ते काम करत आहेत.

केळीच्या सालीपासून सेंद्रीय शु पॉलिश

  • केळीच्या सालीपासून सेंद्रिय शुपॉलिश तयार करण्यात पुण्यातील संशोधकांना यश आले आहे.
  • केळीच्या सालीतून पोटॅशियम मिळवण्यात आले, त्यात मीठ, गेरू, अबीर, ग्लिसरीन हे पदार्थ मिसळण्यात आले. यातून काळे व तपकिरी रंगाचे शुपॉलिश बनवण्यात आले.
  • यासाठी कोणत्याही औद्योगिक रसायनांचा वापर नाही. केळीच्या सालींच्या विल्हेवाटीतून सेंद्रिय शुपॉलिश तयार करता येणार.
  • ५० ग्रॅम साठी चार ₹ उत्पादन खर्च. बाजारातील अन्य पॉलिशचा खर्च २५₹ आहे.
  • या पॉलिश ची चमक चार दिवस राहते.
  • याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, बाजारातील पॉलिशमुळे कर्करोगाचा धोका असण्याची शक्यता असते, म्हणून हा चांगला पर्याय आहे. व केळीशी संबंधित एक नवीन प्रक्रिया उद्योग सुरू होणार.
  • पुणे जिल्ह्यातील शिरूरच्या ताराचंद बोरा महाविद्यालयाचे विद्यार्थी ऋषिकेश लबडे व निखिल मगर यांचा हा प्रकल्प होता.
  • पुणे विद्यापीठातर्फे हा प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर सादर करण्यात आला.
  • केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत याची उत्कृष्ट नवकल्पना म्हणून निवड करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole