29 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

पाच राफेल लवकरच भारतात दाखल

  • फ्रांसकडून राफेल या अत्याधुनिक विमानांचा पहिला ताफा देण्यात आला असून लवकरच तो भारतीय हवाई दलात सामील होणार आहे. ही विमाने अंबाला येथील हवाईतळावर येणार आहेत. राफेलचा करार भारताने पाच वर्षांपूर्वी केला होता.
  • यासोबतच फ्रांसने भारताला जग्वार, मिराज आणि मायसियर विमानांचा पुरवठा केला आहे.

MPSC कडून आता उमेदवार केंद्रित प्रणाली

  • महाराष्ट्र लोकसेवा आता उमेदवार केंद्रित प्रणाली विकसित करत असून ती हाताळण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्यात येणार आहे.
  • यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना कागदपत्रे अपलोड करण्याची, शंका प्रश्नांना उत्तरे, डिजिटल लॉकर सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

चिनी क्लोन अँप वर बंदी.

  • भारताने काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वच्या कारणावरून चीनच्या अँपवरती बंदी घातली होती. पण या पूर्वीच बंदी घालेली अँप क्लोनच्या माध्यमातून चालू असल्याचे दिसताच त्यावरही आता बंदी घालण्यात आली आहे.

COVAXIN च्या मानवी चाचण्यास राज्यात प्रारंभ

  • भारत बायोटेक आणि राष्ट्रीन विज्ञान संस्था यांच्या सहकार्यातून तयार होणारी भारतीय लस COVAXIN च्या मानवी चाचण्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच चालू होत आहेत. याची सुरवात नागपुरातील गिल्लूरकर हॉस्पिटलमधून झाली आहे.
  • दोन पुरुष आणि एका महिलेला ही लस देण्यात आली आहे. त्यानंतर कोणतेही दुष्परिणाम जाणवले नाहीत.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक करून सोडावा


Join us on Telegram and Get all Updates

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole