चालू घडामोडी – 29 December 2020

मध्यप्रदेश धार्मिक स्वातंत्र्य विधेयक २०२०

 • विवाहाच्या किंवा अन्य कोणत्याही उद्देशाने धर्मांतर केले गेले शिक्षा व दंड ठोठावला जातो.
 • उत्तर प्रदेशच्या बेकायदेशीर धर्मांतरण अध्यादेश २०२० सारखेच हे विधेयक आहे.
 • या विधेयकाचे कलम 3 नुसार जबरदस्तीच्या धर्मांतरासाठी ५ वर्षे तुरुंगवास व २५००० ₹ दंड.
 • जर का धार्मिक ओळख लपवण्याचा प्रयत्न केला तर ३ ते १० वर्षे सक्त मजुरी व ₹५०००० दंड.

MPSC च्या संकेतस्थळा मध्ये बदल

 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या संकेतस्थळामध्ये १० वर्षांनी बदल केला आहे
 • दिव्यांग व्यक्तींनाही फॉर्म भरण्याची सोय करण्यात आली आहे.
 • यामुळे प्रश्नपत्रिकाउत्तरपत्रिका, उत्तरतालिकेवर आक्षेप आता ऑनलाईन नोंदवता येतील. सराव चाचण्या, मार्गदर्शक सूचना, ई उत्तरपत्रिका या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • रिक्त पदांची संख्या, पूर्व परीक्षा निकाल, मुख्य परीक्षा निकाल याची सोय उपलब्ध केली गेली आहे.

साताऱ्यातील शिक्षकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

 • लॉकडाउन च्या काळात एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना दूरसंवादाच्या माध्यमातून प्रयोगशील शिक्षण दिल्यामुळे बालाजीनगर येथील जिल्हा परिषद शाळा शिक्षक बालाजी जाधव यांना पुरस्कार.
 • एचबीएन क्रीएटीव्हीटी अँड एक्सक्लुसिव्ह पुरस्कार असं या पुरस्काराचं नाव आहे.
 • हनीबी नेटवर्क व गियान या संस्थांनी हा पुरस्कार दिला आहे.
 • शिक्षणातील प्रयोगशीलता व नवप्रवर्तन या साठी हा पुरस्कार दिला जातो.

एका फुलाची नवी प्रजाती

 • वनस्पती शास्त्रज्ञांनी ‘सन रोज’ या फुलाची एक नवी प्रजाती शोधून काढली आहे.
 • ही प्रजाती या शास्त्रज्ञांना पूर्व घाटावर सापडली.
 • या प्रजातीचं नाव ‘पोर्तुलाका लालजी’ असं ठेवण्यात आलं असून ती आंध्रप्रदेश मधील प्रकासम या जिल्ह्यात सापडली.
 • तिची खास वैशिष्ट्ये: या झाडाची मुळे कंदयुक्त आहेत, पानांच्या अक्षावर पर्णकेश नाहीत. लालसर गुलाबी रंगाचे फुल आहे. अंड्याच्या आकाराची त्याची फळे आहेत. तांबूस तपकिरी रंगाच्या बिया आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole