28 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

महाराष्ट्राची कर्जरोख्यांतून दीड हजार कोटींची उभारणी

  • अनेकदा सरकारच्या कर्जरोख्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या गुंतवणूकदारांनी सध्या कोरोनाकाळात कर्जरोख्यांना मात्र भरभरून प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र सरकारने 1000 कोटींची उभारणी करण्यासाठी कर्जरोखे जाहीर केले पण उत्साही प्रतिसादामुळे दीड हजार कोटींचे कर्जरोखे उभे करावे लागले आहेत.
  • अपेक्षेपेक्षा जास्त मागणी झाल्याने रोखेविक्रीसाठी ‘ग्रीनशू’ तरतूद वापरण्यात आली आहे. या कर्जरोख्यांवर सुमारे साडेसहा टक्के व्याज देण्यात येणार आहे.

उत्साह का?

  • करोनच्या महामारी काळात अर्थव्यवस्थेत अनिश्चितता दिसत आहे त्यामुळे सरकारी गुंतवणूक बुडणार नाही, सुरक्षित राहील या भावनेने गुंतवणूकदारानीं गुंतवणूक केली आहे.

यंग युनिव्हर्सिटी क्रमवारी

  • टाइम्स हायर एज्युकेशनने नुकतीच यंग युनिव्हर्सिटी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये जगभरातील पहिल्या शंभर युनिव्हर्सिटीमध्ये भारतातील दोन युनिव्हर्सिटीचा समावेश आहे. IIT Ropar आणि IIT Indore या अनुक्रमे 62 आणि 64 स्थानी आहेत. तर आयसर पुणेला 101 ते 150 श्रेणीत स्थान मिळाले आहे.
  • पहिल्या स्थानी द हॉंगकॉंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी तर दुसऱ्या स्थानी नानयांग टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी सिंगापूर आहे.

निकष

  • अध्यापन
  • संशोधन
  • आंतरराष्ट्रीय कामगिरी

वंदे भारत मिशन – ७२५ विमाने, १ लाख ४५ हजार भारतीय मायदेेशी

  • करोनाच्या वाढत्या समस्येमुळे जगभरातील भारतीय विविध देशांत अडकले होते. यानंतर भारत सरकारने आपल्या नागरिकांना सुरक्षित मायदेशी परत आणण्यासाठी वंदे भारत मिशन आखले होते.
  • 6 मे पासून या मिशनद्वारे भारतीयांना मायदेशी आणण्यास सुरवात झाली. यामध्ये ७२५ विमानांद्वारे १ लाख ४५ हजार भारतीय मायदेेशी परतले आहेत. तर याच कालावधीमध्ये ५० हजार लोक भारतातून जगभरात गेले आहेत.

रयत’च्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड

  • तळागाळात शिक्षण पोचवण्याच्या उद्देशाने कार्यरत असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार आणि चेअरमनपदी डॉ. अनिल पाटील यांची फेरनिवड झाली आहे. या निवडी आगामी तीन वर्षांसाठी असणार आहेत. महाराष्ट्रासह रयत आता कनाटकमध्येही विस्तारात आहे.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक सोडावा

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole