चालू घडामोडी- 27 जून 2021

Twitter ने केली माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांच्या खात्यावर कारवाई

  • अमेरिकेतील कायद्याचे उल्लंघन झाल्याचे कारण देत ट्विटर इंडिया (Twitter India) या कंपनीने केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांच्या खात्यावर कारवाई केली . त्यांचे खाते तासभर बंद करण्यात आले होते.
  • प्रसाद यांना इशारा देत हे खाते पुन्हा सुरू करण्यात आले.
  • ट्विटर ने केलेल्या कारवाईची माहिती प्रसाद यांनी आधी कू या देशी समाजमाध्यमातून दिली व नंतर ट्विटर वरून दिली.
  • अमेरिकेतील सहस्त्राब्दी अंकदर्शी ग्रंथसंपदा कायद्याअंतर्गत प्रसाद यांचे खाते तात्पुरते बंद करण्यात आले होते.
  • हे खाते पुन्हा सुरू करताना ट्विटर ने पाठवलेल्या संदेशात या कारवाईचे कारण स्पष्ट केले होते.
  • पुन्हा कायद्याचे उल्लंघन झाल्यास खाते निलंबित केले जाईल किंवा बंद केले जाईल.
  • त्यामुळे प्रसाद यांनी खात्यावरून कायदाभंग करणारा मजकूर काढून टाकावा, अशी समज देण्यात आली आहे.
  • भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या नव्या नियमांचे पालन करत नाही म्हणून कलम ७९ अंतर्गत ‘ट्विटर’ने ‘मध्यस्थ’ हा दर्जा गमावला आहे.
  • खाते बंद करण्यापूर्वी कंपनीने आगाऊ सूचना दिली नव्हती.
  • त्यामुळे ट्विटर ने केलेली कारवाई मध्यस्थ संदर्भातील नियम ८ (४) चे उल्लंघन ठरते.
  • नव्या नियमांचे ट्विटर ने पालन केले असते तर कंपनीला खाते बंद करता आले नसते.
  • ट्विटरच्या या कृतीमुळे कंपनीला व्यक्तिस्वातंत्र्याशी काही देणं घेणं नसल्याचं दिसून आलं.

अमेरिकेतील दोन लाख भारतीयांवर माघारी परतण्याचे संकट

  • वयाच्या एकविशीत आल्यावर आई वडिलांवर अवलंबून राहता येत नाही.
  • या मुलांच्या आई वडिलांना ग्रीन कार्ड मिळालेले नाही.
  • ग्रीनकार्ड मिळवण्यासाठी काही कागदपत्रे सादर करावी लागतात.
  • नंतर अमेरिकेत (U.S.A.) कायमच्या वास्तव्यासाठी परवाना मिळत असतो. सहा युवकांनी एक पूर्ण आठवडा अमेरिकेच्या राजधानीत म्हणजे वॉशिंग्टन डी सी (Washington D C) मध्ये घालवला. आम्ही अमेरिकेत राहू द्या. ते आमचं घर आहे. आम्हाला घालवू नका, असं आवाहन त्यांनी केलं.
  • द ड्रीम या संस्थेच्या नेतृत्वाखाली काही तरुण स्थलांतरित एकत्र आले होते. बराच काळ व्हिसा असलेल्या व्यक्तींची ही मुले आहेत.
  • दोन लाख ‘ड्रीमर्स’ चा त्यात समावेश आहे.

पाकिस्तान ‘FATF’ च्या करड्या यादीत कायम

  • हाफीज सईद – प्रमुख जमात उद्द दावा, मौलाना मसूद अजहर- प्रमुख जैश ए मूहम्मद यांच्यावर कारवाई करण्यास असमर्थ ठरल्याबद्दल आर्थिक कारवाई कृती दलाने (Fanancial action task force) ने पाकिस्तान (Pakistan) चा करड्या यादीतील समावेश कायम ठेवला.
  • पॅरिस मध्ये झालेल्या आभासी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • पाकिस्तान २०१८ मध्ये एकूण २७ मुद्द्यांवर कारवाई करायला सांगितले होते. त्यापैकी पाकिस्तानने २६ मुद्द्यांची पूर्तता केली आहे.
  • संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलेल्या मसूद व सईद वर कारवाई करावी, असं एफएटीएफ ने पाकिस्तान को बताया था.
  • मनीलाऊंडरिंग ला आळा घालण्यात पाकिस्तान असमर्थ ठरल्याने भ्रष्टाचार व  दहशतवादाला आर्थिक सहाय्य करण्याचे प्रकार वाढले.

पहिली स्वदेशी विमानवाहू नौका जुलै २०२२ मध्ये

  • पहिली स्वदेशी विमानवाहू नौका जुलै २०२२ मध्ये कार्यान्वित होईल.
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh) यांनी कोचीन बंदराजवळ एर्नाकुलम येथे भेट दिली असताना या नौकेची पाहणी केली.
  • भारतासाठी ही युद्धनौका अभिमानास्पद असून आत्मनिर्भर भारतासाठी टाकलेलं ते पाहिलं पाऊल आहे.
  • युद्धनौकेची मारक क्षमता मोठी असून ती वैविध्यपूर्ण आहे.
  • भारताच्या संरक्षण क्षमतेत त्यामुळेच भर पडणार आहे.
  • देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यास ही युद्धनौका सज्ज असेल.

भारताचा अपारंपारिक ऊर्जेच्या क्षमतेच्या बाबतीत जगात चौथा क्रमांक

  • ‘The India Story’ भारताचा ऊर्जा संक्रमणाबाबतचा असलेला पुढाकार य संदर्भातील ही माहिती पुस्तिका आहे.
  • भारताची अपारंपारिक ऊर्जेची (Renewable energy) क्षमता ही अडीच पटीने वाढली आहे. १४१ गिगा वॅट (ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जलशक्तीही आहे) ही एकूण उर्जाक्षमतेच्या ३७% इतकी आहे.
  • यामध्ये सौर ऊर्जेचा वाटाही मोठा आहे. ही क्षमता १५ पटीने वाढली आहे. ही क्षमता ४१.०९ गिगा वॅट इतकी झाली आहे.
  • भारताची अपारंपारिक ऊर्जेची क्षमता ही जगात चौथ्या क्रमांकावर आली आहे.
  • गेल्या ७ वर्षात भारतातील अपारंपारिक ऊर्जेच्या क्षेत्रात ७००० करोड अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे.
  • भारताने अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील परदेशी गुंतवणुकीसाठी खूपच उदारमतवादी धोरण स्वीकारलं आहे. त्यासाठी १००% थेट परदेशी गुंतवणूकीला खुलेपणा दिलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole