27 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

ज्येष्ठ विधीतज्ञ भास्करराव आव्हाड यांचे निधन.

  • ज्येष्ठ विधीतज्ज्ञ आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा चे माजी अध्यक्ष भास्करराव आव्हाड यांचे 77 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले.
  • शिराळ चिंचोडी ( अहमदनगर ) हे त्यांचे मूळ गांव. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात संचार असलेल्या आव्हाड यांचा विद्यार्थीप्रिय शिक्षक असा लौकिक होता. पुण्यातील MIT संस्थेच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.

अभयसक्रमाला कात्री

  • कोरोनामुळे या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यन्त प्रत्येक विषयातील 25 टक्के अभयसक्रमाला कात्री लावण्यात आली आहे.
  • या आधीच केंद्रीय शिक्षण मंडळाने अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनातर्फे देण्यात येणारा यंदाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार नंदेश विठ्ठल उमप याना तर माता रमाई मातृ शक्ती पुरस्कार सावित्री साठे याना जाहीर झाला आहे.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक करून सोडावा


Join us on Telegram and Get all Updates

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole