चालू घडामोडी – 26 मे 2021

अटलबोगदा भेटीसाठी एआयसीटीईची खास योजना

  • अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) हिमाचल प्रदेश मधील ‘अटल बोगदा’ विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी एक नवीन योजना तयार केली आहे.
  • यूथ अंडरटेकिंग व्हिजिट फॉर ऍक्वायरिंग क्नॉलेज (युवक): स्टडी टूर फॉर अटल टनेल असं या योजनेचं नाव आहे.
  • या योजनेअंतर्गत एकूण शंभर महाविद्यालयातील एक प्राध्यापक, दहा विद्यार्थ्यांना बोगदा भेटीसाठी दोन लाखांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे.
  • देशातील तंत्रज्ञानाचा चमत्कार, अभियांत्रिकी रचना, नियोजन, बांधकाम व प्रकल्प व्यवस्थापनातील उत्तम कार्यपद्धती समजून घेण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी देशांतील बोगद्याला भेट देऊन देशांतील बोगदा निर्मितीच्या क्षमता आत्मसात कराव्यात, असं पंतप्रधानांनी या बोगद्याच्या उद्घाटन प्रसंगी सांगितलं होतं.
  • या योजनेअंतर्गत एआयसीटीईने काही निकष ठरवले आहेत. त्यानुसार एआयसीटीईशी संलग्न तंत्रशिक्षण संस्थांपैकी एनआयआरएफ २०२० या यादीत १ ते ५०० या गटामध्ये स्थान मिळवलेली महाविद्यालये या योजनेसाठी पात्र ठरतील.
  • स्थापत्य, मेकॅनिकल, माहिती तंत्रज्ञान, स्ट्रक्चरल च्या पदवी व पदव्युत्तर च्या द्वितीय व तृतीय वर्षातील १० विद्यार्थी व एक प्राध्यापक यांना सहलीच्या खर्चाचा निधी दिला जाणार आहे.
  • एकूण १०० महाविद्यालयांना हा निधी मिळणार आहे. त्यात एनआरओ व एनडब्लूआरओ या गटातील महाविद्यालयांना १ लाख ७० हजार तर बाकी महाविद्यालयांना २ लाखांचा निधी मिळणार आहे.

राज्यात वाघांच्या संख्येत वाढ

  • अलिकडच्या काळात महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सध्या ३१२ वाघ आहेत.
  • त्यातही चंद्रपूर जिल्ह्यात वाघ जास्त आहेत.
  • या भागांत मानव व वन्यजीव संघर्षामध्ये ही वाढ झाली आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र वाढवण्याची गरज आहे.
  • त्या दृष्टीने लगतच्या दोन गावांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
  • राज्यातील वाघांची संख्या आणखी वाढणार तर हे गृहीत धरून आतापासून त्यावर मार्ग काढणे उपाययोजना करणे गराजेचे आहे.हे केले तरच मानव वन्यजीव संघर्ष टळू शकतो.
  • यासाठी अभयारण्याजवळच्या गावांचे पुनर्वसन करण्यात यावे. शक्यतो गावकऱ्यांना रोखीने नुकसान भरपाई द्यावी.

महाराष्ट्रात २० वाघ मृत्युमुखी

  • राज्यात गेल्या पाच महिन्यात २० वाघांचा मृत्यू झाला आहे. यांत पूर्ण वाढ झालेले १२ तर आठ बछडे होते.
  • महाराष्ट्र देशांत वाघांच्या मृत्यू मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर आघाडीवर मध्यप्रदेश हे राज्य आहे.
  • पण वाईल्ड लाईफ सोसायटी ऑफ इंडिया च्या माहिती नुसार महाराष्ट्रात २२ तर मध्य प्रदेशात २१ वाघ मृत्युमुखी पडले आहेत.
  • देशांतील ७०% वाघ हे मध्य भारतात आढळतात. या परिसरात वाघांना धोका वाढला आहे. चोरट्या शिकारी, अधिवास कमी होणे, अधिवास मिळवण्यासाठी होणाऱ्या लढाईत मरण पावणे, अपघाती मृत्यू यांचं त्यात समावेश आहे.
  • यंदा राज्यात मृत वाघांची संख्या वाढल्यामुळे वनविभागासाठी ही चिंतेची बाब ठरली आहे.

बंगालच्या उपसागरातील ‘यास’ आता अतितीव्र चक्रीवादळ

  • बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर
  • चक्रीवादळात झाले आहे.
  • ओमानकडून त्या वादळाला ‘यास’ हे नाव मिळाले आहे.
  • हे चक्रीवादळ आता अतितीव्र स्वरूप धारण करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • आता हे वादळ उत्तर पश्चिम दिशेने उडिशा व पश्चिम बंगालकडे जाणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.
  • २६ मे ला हे वादळ या बंगाल उडिशाच्या किनारपट्टीला धडकणार आहे.
  • अतितीव्र स्वरूपाच्या चक्रीवादळाचा वेग १५५ ते १८५ किमी पर्यंत जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • उडिशा, बंगाल , आंध्रच्या किनारी भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

भारत व इस्राईल यांच्यादरम्यान तीन वर्षांचा कृषी कार्यक्रम

  • भारत आणि इस्राईल यांनी ‘भारतइस्राईल श्रेष्ठ कृषी प्रकल्प’ व ‘भारत इस्राईल श्रेष्ठ ग्राम प्रकल्प’ हे दोन मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत.
  • भारत इस्राईल श्रेष्ठ ग्राम प्रकल्प’ ही एक नवी संकल्पना आहे. जी आठ राज्यांतील ७५ गावातल्या १३ प्रकल्पकेंद्रावर राबवण्यात येणार आहे.
  • भारत इस्राईल श्रेष्ठ ग्राम प्रकल्प याद्वारे आधुनिक शेतीच्या पायाभूत सुविधा, क्षमता बांधणी, बाजापेठेशी थेट जोडले जाणे या सगळ्या मुद्द्यांवर काम केले जाणार आहे.

1 Comment
  1. Kanhaiya says

    Hi

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole