26 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या कक्षेत.

  • नागरी सहकारी बँका आणि बहुराज्य सहकारी बँक आता रिजर्व्ह बँकेच्या अखत्यारीत आणण्याच्या महत्वपुर्ण निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. याबाबत सरकारने वटहुकूम काढला असल्याचे सांगण्यात आले.
  • यावर महोदय राष्ट्रपतींनी स्वाक्षरी करताच देशातील 1482 नागरी सहकारी बँका आणि 58 बहुराज्य बँक व्यवहार रिजर्व्ह बँकेच्या अखत्यारीत येतील.
  • सहकारी बँकांना आर्थिक व्यवस्थापनमध्ये शिस्त लावण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलायचे सरकारने सांगितले आहे.

अर्थतज्ज्ञ जयंत खेर यांचे निधन

  • अर्थतज्ज्ञ आणि बँकर जयंत खेर यांचे निधन झाले. खरे स्टेट बँकेत उच्चधिकारी होते नंतर त्यांनी खासगी कंपनीत नोकरी केली. ग्रंथाली परिवारातील ते एक महत्वाचे सदस्य होते.
  • कोणतेही काम नफा केंद्री असले पाहिजे अस त्यांचं मत असायचं. जयंत खेर यांनी मेकौलेच्या चरित्राची चार प्रकरणे लिहिली होती.

सर्वात जास्त तीव्रतेच्या गुरुत्वीय लहरी

  • लायगो व्हरगो प्रयोगशाळांच्या संयुक्त प्रयत्नांतून अतिघन खगोलीय पदार्थापासून निघालेल्या गुरुत्वीय लहरींची नोंद करण्यास यश मिळाले आहे.
  • GW 190814 असे सांकेतांक दिलेल्या या लहरीवर आजवर नोंद झालेल्या सर्वात मोठ्या तीव्रतेच्या नोंदल्या गेल्या आहेत. अस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स या संशोधनपत्रिकेमध्ये याबाबत शोध निबंध प्रसिद्ध झाला आहे.

भारताचा विकासदर – 4.5%

  • कोरोना साथीमुळे भारतीय अर्थव्यवस्था ऐतिहासिक तळ गाठण्याची भीती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केली आहे. चालू 2020-21वित्त वर्षकरिता देशाचा GDP – 4.5% असेल अस आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या नव्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक सोडावा

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole